आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ मिनिटे युवकाचा थयथयाट, महाराष्ट्र एक्स्प्रेसवर चढून दिली आत्महत्येची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महाराष्ट्र एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी ११.३० वाजता फलाट क्रमांक दोनवर थांबली. या वेळी ३० वर्षांचा युवक गाडीच्या डब्यावर चढला. तारेला हात लावण्याची तो धमकी देऊ लागला. मात्र, आरपीएफच्या महत्प्रयासाने अखेर २५ मिनिटांच्या थयथयाटनंतर त्याला खाली उतरवण्यात आले. या प्रकाराने २५ मिनिटे गाडीला उशीर झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

धूलिचंद मराठे रा. लामटा जि. बालाघाट मध्य प्रदेश, असे या युवकाचे नाव आहे. सकाळी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी ११.३० वाजता रेल्वेस्थानकावर आली. या वेळी गाडीतून उतरून धूलिचंद हा रेल्वेच्या डब्यावर चढला स्टंटबाजी करू लागला. त्याचा प्रताप पाहून आरपीएफच्या जवांनानी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ताराला हात लावून आत्महत्या करण्याच्या धमक्या देऊ लागला. त्यामुळे आरपीएफ जीआरपीएफची त्रेधातिरपट झाली. अथक प्रयत्नानंतर गाडी उभी असलेल्या दरम्यानचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर त्याला खाली उतरवण्यात आले. यामध्ये गाडी २५ मिनिटे उशीर झाली. आरपीएफचे ठाणा निरीक्षक राजेश बढे यांच्या मार्गदर्शनात युवकाचे प्राण वाचवण्यात यश आले.

रेल्वे पोलिसांचा आरोपीला ताब्यात घेण्यास नकार :
रेल्वे स्थानकावरील सुरक्षेची जबाबदारी आरपीएफची आहे. मात्र, कायदा सुव्यवस्था निर्माणझाली, तर त्याची जबाबदारी ही लोहमार्ग पोलिसांवर असते. गुरुवारी घडलेल्या प्रकारानंतर आरपीएफने धुलीचंद मरठे याला पकडले पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला. आरोपीवर तुम्हीच कारवाई करा, अशी भूमिका रेल्वेपोलिसांनी घेतली. अखेर पुन्हा त्या आरोपीला आरपीएफने त्यांच्या ताब्यात घेतले. पुढील कारवाई आरपीएफ करत आहे.