आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासांनंतर धरणात सापडला तरुणाचा मृतदेह, संत गाडगेबाबा बचाव पथकाचे शोध कार्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- पोपटखेड धरणात गणपती विसर्जन करतांना बुडालेल्या दिनेश श्रीराम गुजर (२५) रा. अकोट याचा मृतदेह अाज २४ तासानंतर संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथकाने ९५ फुट खोल पाण्यातून बाहेर काढला. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी ४५ किलोची लोखंडी रॅम्प वायर रोपला बांधून रबर रेस्क्यू बोटच्या सहाय्याने धरणात ४-५ तास सतत शोध कार्य चालू ठेवले.
 
पथक प्रमुख दीपक सदाफळे त्यांचे सहकारी प्रशांत सनगाळे यांनी प्रथम पाण्यात तळाशी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ९०-९५ फुट खोल पाणी असल्याने शक्य होत नव्हते. पुन्हा बोट रॅम्पने सर्च ऑपरेशन चालू केले आणि शेवटी मृतदेह वर आणला. या यशस्वी ऑपरेशनसाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, संजय शेळके , अकोट, महेश साबळे, प्रशांत सनगाळे आगर , विशाल सनगाळे आगर, आणि मुंडगाव येथील संत नगरी आपत्कालीन सेवा पथक, तसेच महसूल मंडळ अधिकारी प्रशांत सायरे,ओइंबे, व्हि. एम. देशमुख, तलाठी ए. आर. चव्हाण,आर. व्हि. बोकाडे, पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण चे मिलिंद बाहाकर रुपनर, पोलीस कर्मचारी हजर होते. 
 
आज सकाळी अकोट तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती विभागात असलेली रबरी बोट धरणावर आणण्यात आली. परंतु तिला तहसीलमधील उंदरांनी कुरतडलेलेे असल्यामुळे त्या बोटीत हवाच भरता आली नाही. अकोटच्या महसूल मधील अधिकारी कर्मचारी एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यास किती सज्ज असतात या परिसरातील जनते प्रति हे किती जबाबदार आहेत याचीच चर्चा धरण परिसरात होती. 
 
या धरणात दरवर्षी एकतरी जीव जातोच परंतु पोलीस महसूल अथवा पाटबंधारे विभाग कोणतीही स्थायी उपाय योजना करायला अजूनही तयार नाही किंवा या भागाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे काही प्रभावी उपाय योजना करण्यास अजूनतरी असमर्थ असल्याचे दिसून येत आहेत. मृतकाच्या कुटुंबीयांची हेळसांड होऊ नये म्हणून प्रशासन लोकप्रतिनिधींनी मदत जाहीर करावी अशी मागणी घटना स्थळावर नागरिक करीत होते. 
 
बातम्या आणखी आहेत...