आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांझोट्या सोयाबीनचा बळी, युवा शेतकऱ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - तालुक्यातील गोरेगाव येथील २६ वर्षीय युवा शेतकऱ्याने अस्मानी सुलतानी संकटामुळे वांझोट्या ठरलेल्या सोयाबीनमुळे कर्जाला कंटाळून टोकाची भूमिका घेत विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सप्टेंबरला घडली. गोरेगाव येथील रोशन अर्जुन देवळे, वय २६ वर्षे याच्याजवळ वडीलांची साडेपाच एकर शेती असून, यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. इतरांची शेती लागवणने घेऊन त्यातही कुटुंबीय राबत होते. यंदा सोयाबीनचा पेरा केला. 

या उत्पन्नातून लागवणचे पैसे देऊन उर्वरित रकमेतून अंगावर असलेले पीक कर्ज देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह कुटुंबीयांची जबाबदारी पूर्ण होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे पिकाला जबर फटका बसला. त्यात सोयाबीनला एकही शेंग आल्याने शेतकरी खचून गेला. आपल्यावर अवलंबून असलेले आई, वडील, भाऊ, बहीण त्यात एक लाखांवर असलेले पीक कर्ज या चिंतेमुळे रोशन काहीच सांगता घरून निघून गेला. दरम्यान, सकाळी शेतशिवारात त्याने विष प्राशन केल्याचे निदर्शनास आले. 
बातम्या आणखी आहेत...