आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या, नापिकीमुळे कर्ज फेडणे झाले होते मुश्किल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रामपूर- कर्जबाजारीपणाला कंटाळून एका युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. ही घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील सोनाळा येथे घडली. तालुक्यातील सोनाळा येथील रहिवासी शिवाजी अंबडकार या शेतकऱ्याकडे सायखेड शिवारात गट क्रमांक ७५ मध्ये दोन एकर सहा गुंठे शेती आहे.
 
मागी त्यांचे वडील शंकर जयराम अंबडकार यांच्या नावावर स्टेट बँकेचे तीस हजारांचे कर्ज होते. तसेच ग्रामसेवा सहकारी सोसायटीकडूनही त्यांनी १७ हजारांचे कर्ज उचलले होते. नापिकीमुळे कर्ज फेडणे मुश्किल झाले होते. यामुळे हतबल झालेल्या शिवाजी अंबडकार यांनी ३० ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले. ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयातून अकोला येथे हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...