आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसपी ऑफिसमध्ये विष घेऊन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रेमविवाह करून परतलेल्या युवकाची प्रेयसी तिच्या माहेरी गेली. तिला परत पाठवण्यास तिच्या आई-वडिलांनी नकार दिल्यामुळे उद्विग्न झालेल्या युवकाने थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले आणि विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

सिंधी कॅम्पमधील एकाच समाजातील युवकाने आणि युवतीने घरून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी खदान पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रारही दिली होती. मात्र, हे दोघेही युगुल मंगळवारी खदान पोलिस ठाण्यात दाखल झाले. या वेळी मुलाकडील आणि मुलीकडील लोकांनी मध्यस्थी करून पाहिले. काही दिवस मुलीला तिच्या आई-वडिलांकडे ठेवण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला. नातेवाइकांच्या दबावापोटी मुलगी तिच्या आई-वडिलांकडे गेली. मात्र, त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला पाठवण्यास नकार दिल्यामुळे मुलगा व्यथित झाला. त्याने थेट आपल्या पत्नीला पाठवत नसल्यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले आणि विष प्राशन केले. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले.