आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी रोड चौपाटीवर युवकाची केली हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गांधीरोडवरील चौपाटीवर एका युवकाचा चाकून भोसकून खून करण्यात आला. युवक रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चार ते पाच हल्लेखोर पळून गेले. ही घटना गुरुवारी संध्याकाळी वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली.
अकोट फैलातील पाचमोरी येथील रहिवाशी जमीर अली नसरत अली वय २५ हा त्याच्या मित्रांसोबत चौपटीवरील एका हॉटेलमध्ये बसले होते. दरम्यान त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाले. यावेळी त्यांच्या सोबत्यांनी त्याला हॉटेलच्या बाहेर ओढले आणि त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात जमीर अली नसरत अली पडल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल जुमळे त्यांच्या ताफ्यासह दाखल झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या युवकाला त्यांनी रुग्णालयात हलवले. घटनेनंतर पोलिसांनी लगेच संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरु केली असून त्यांचाहल्ल्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काय संबंध होता, त्याची सखोल चौकशी पोलिस करीत आहेत. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्थिक देवाण-घेवाणीतून हत्या : मृतकजमीर अली याच्याकडे दोन वर्षापासून काही हल्लेखोरांचे १७ हजार रुपये उधार होते. पैसे देण्यासाठी हल्लेखोरांनी त्याच्यावर दबाव आणला होता. गुरुवारी पैसे देण्यास युवक असमर्थ असल्यामुळे त्यांच्यात हॉटेलमध्ये वाद झाला. त्यातून युवकाची हत्या करण्यात आली. आरोपी गुलाम हुसेन औलाद हुसेन याला पोलिसांनी अटक केली होती. तर अन्य तिघांचा शोध पोलिस घेत आहेत.

लवकरच अटक करू
^आर्थिक व्यवहारातून जमीर अली या युवकाची हत्या झाल्याचा संशय अाहे. त्याच्या मारेकरी निष्पन्न झाले आहेत. गुलाम हुसेन औलाद हुसेन या मुख्य आरोपीला अटक केली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केल्या जाईल.'' विजयकांत सागर, अप्पर पोलिस अधीक्षक

चौपाटीवर पळापळ
संध्याकाळी चौपाटीवर शहरातील अनेक जण पाणीपुरी,आईस्क्रीम खाण्यासाठी जातात. त्यातही महिलांची संख्या सर्वाधिक असते. चौपाटीवरील सर्वच दुकाने, हॉटेल भरगच्च होती. अचानक युवकावर चाकूने सपासप वार केल्यानंतर या भागात दहशत पसरली होती. महिला आणि अनेकांची पळापळ झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.
बातम्या आणखी आहेत...