आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील तरुणाचा खून; आरोपी निर्दोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला/हिंगोली - अकोल्याच्या रवी डोईफोडे खून प्रकरणात येथील जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आज सर्व सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. शहरातील लाला लजपतरायनगरातील जुन्या विहिरीत २५ मे २०१५ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी तत्कालीन फौजदार विवेक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून येथील शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आढळलेला मृतदेह हा रवी डोईफोडे (३५) रा. अकोला याचा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात वाशीम येथील पोलीस कर्मचारी सविता बाबुराव चव्हाण दिलीप भुजंग लेकुळे यांच्यासह वाशीम येथील उषा दादाराव मुंढे, राजेश बाजीराव ढाले, शिवाजी केशव तर्हाळ (दोघे रा. आनंदनगर, हिंगोली) निवा उर्फ निवृत्ती छत्रपती ढाले (रा. बासंबा ता. हिंगोली) यांच्याविरुद्ध येथील जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. या प्रकरणात ३३ साक्षीदार तपासले होते. या प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायाधीशांनी सर्व सहाही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे निकाल लागेपर्यंत सविता चव्हाण वगळता इतर पाचही आरोपी कोठडीतच होते.
बातम्या आणखी आहेत...