आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीच्या पाचव्या वर्गामध्ये शिकायला विद्यार्थीच नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शिक्षणाच्या मूलभूत अधिकारानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वाधिक निधी पुरवला जातो. मात्र, अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या खाऊ भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांवर कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे. शहरातील काही शाळांमध्ये पाचव्या वर्गात एकही विद्यार्थी नाही, तर सहावी आणि सातवीच्या वर्गातही दोन ते तीन विद्यार्थी संख्या असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ११ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांकडे शिक्षण विभागाचे आणि जिल्हा परिषद प्रशासनाचे कायम दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या नसताना त्यासाठी काहीही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. अकोला शहरात चार माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये पाचवी, सहावी आणि सातवीची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. यांपैकी हरिहरपेठेतील टाउन उर्दू आणि मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या अवाक् करणारी आहे. या शाळेमध्ये पाचव्या वर्गात एकही विद्यार्थी नाही, तर शिक्षक म्हणतात, एक विद्यार्थी दररोज येतो.
पण, त्याचे नाव शाळेत घातलेले नाही, तर सहाव्या वर्गामध्ये दोन विद्यार्थी आणि सातवीत तीन विद्यार्थी आणि रतनलाल प्लॉट येथील उर्दू माध्यमिक शाळेत पाचवीत केवळ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या सावित्रीबाई कन्या शाळेचीही परिस्थिती विदारक असून, निम्म्याहून अधिक विद्यार्थी संख्या यंदा घसरली आहे. या शाळांकडे कायम दुर्लक्ष होत असल्यामुळे त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.

पदाधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष
शिक्षण सभापतिपद आणि अध्यक्षपद हे केवळ मानाचे झाले अाहे. एकाही शाळेत शिक्षण सभापतींनी भेट दिली किंवा तेथील समस्या जाणून सभागृहात त्या सोडवून घेतल्याचे उदाहरण नाही. शाळा बांधकाम यापलीकडे पदाधिकाऱ्यांचा इंटरेस्ट दिसून येत नाही.


मराठी शाळा
जि. प. शाळा रतनलाल प्लॉट
जि.प. हायस्कूल टाउन शाळा हरिहरपेठ
पाचवीमध्ये - ०१ विद्यार्थी
सहावीमध्ये - ०२ विद्यार्थी
सातवीमध्ये - ०३ विद्यार्थी
पाचवीमध्ये - विद्यार्थी
सहावीमध्ये - ०३ विद्यार्थी
सातवीमध्ये - २३ विद्यार्थी

सावित्रीबाई फुले कन्या शाळा अकोलामध्येही तिपटीने विद्यार्थी संख्या घसरली आहे
सीईओंनी शाळांची माहिती घ्यावी. जिल्हा परिषदेचे प्रमुख म्हणून सीईओंची जबाबदारी असते. आपल्या शाळांची काय अवस्था आहे. हे त्यांनी शाळेत जाऊन पहावे, शाळांना जर मोठ्या प्रमाणात निधी पुरवल्या जात असेल, तर या शाळांमध्ये विद्यार्थी का नाहीत, याचीही पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

खासगीकडे विद्यार्थ्यांचा कल
शहरातील महापालिकेची शाळा एक मॉडेल शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. त्या शाळेत क्षमतेपेक्षा पटसंख्या आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडे अशी एकही शाळा नाही की, ती वाखाणण्याजोगी आहे. माध्यमिक शिक्षण देणाऱ्या अनुदानित शाळांमध्ये कोणतेही शिक्षण शुल्क भरावे लागत नाही. तसेच शिक्षण उत्तम असल्यामुळे अशा शाळांकडे पालकांचा कल वाढतो आहे.

दोनच शाळांमध्ये मुख्याध्यापक
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हे वर्ग दोनचे आहे. ११ पैकी केवळ दोनच शाळांमध्ये कायम मुख्याध्यापक आहेत. बाकी सर्व शाळा प्रभारींवर आहेत. शाळांमध्ये शाळेची जबाबदारी घेणारे मुख्याध्यापकच नसतील, तर त्या शाळांची परिस्थिती काय असेल, यावर विचार केलेलाच बरा. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत. हे पद भरण्यासाठी प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. सावित्रीबाई फुले कन्या शाळा, अकोला आणि अडगाव येथील जि.प. च्या शाळेतच मुख्याध्यापक आहेत.


सहावीमध्ये - २३ विद्यार्थी
सातवीमध्ये - ३० विद्यार्थी
पाचवीमध्ये - ०६ विद्यार्थी