आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्‍हा परिषदेत टिसीसाठी पैशांची मागणी, पालकांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - चांदूर येथील जिल्हा परिषद शाळेत टिसी (शाळा साेडल्याचा दाखला) देण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करीत असल्याचा अाराेप करीत पालकांनी मंगळवारी शाळेत धाव घेतली. अनेक दिवसांपासून विद्यार्थी विना टिसीच खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याचेही उजेडात अाले अाहे. 
 
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता अाठवा वर्ग सुरु करण्यात अाला अाहे. त्यामुळे पाल्यांना जि.प. शाळांच्याजवळ असलेल्या खासगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, कि जि.प. शाळेतच प्रवेश कायम ठेवावा, अशा दुविधेत पालक सापडतात. अनेकदा जि.प. शाळा खासगी शाळांमध्ये प्रवेशावरुन वादही हाेताे. काही दिवसांपूर्वी डाबकी राेडवरील दाेन शाळांमधील असाच वाद चव्हाट्यावर अाला हाेता. टिसी मिळण्यासाठी पालकांनी पाल्यांना घेत थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या दिला हाेता. 

दरम्यान, टिसीच्या मुद्यावरुन मंगळवारी चांदूर येथील जिल्हा परिषद शाळेत पालकांनी धाव घेतली. या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पुंडलीक बाबा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला अाहे. काही पालकांनी पाल्यांचा इयत्ता ७वी उत्तीर्णचा दाखला मिळावा, यासाठी मुख्याध्यापकांकडे अर्ज केला. मात्र टिसीसाठी ५०० रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा अाराेप पालकांनी केला. तातडीने टिसी देण्याची मागणी पालकांनी केली. काही विद्यार्थी विना टिसीच खासगी शाळेत शिक्षण घेत असून, शाळेने पालकांकडून प्रतिज्ञालेख लिहून घेतला अाहे. 
 
शाळेने टिसी द्यावी : गुलवाडे 
चांदूरच्या त्या विद्यार्थ्यांना जि.प.शाळेने टिसी देणे अावश्यक अाहे. यासाठी नियमानुसार नाममात्र शुल्क घेता येतात. मात्र यापेक्षा जादा पैसे घेणे चुकीचे अाहे. टिसी मिळण्यासाठी अाम्ही पालकांनीही प्रयत्न केले अाहेत. टिसीसाठी पालक जि.प. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनाही भेटले हाेते, असे पुंडलीक बाबा हायस्कूलच्या संस्थाध्यक्षा पुष्पा गुलवाडे यांंनी सांगितले. 
 
अर्ज अाजच मिळाले 
टिसीसाठी पालकांचे अर्ज मंगळवारीच मिळाले. शाळा डिजिटल करण्यासाठी अाणि संगणक शिक्षणासाठी पैशांची अावश्यक असते. यासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही. अाता टिसीबाबतचा मुद्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार अाहे. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. 
- दिलीप अंधारे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा.
 
बातम्या आणखी आहेत...