आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोशनी जिंदगी में’; ११४ जणांचा नेत्रदानाचा संकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दिशाग्रुप दिशा आय बँकेतर्फे शहरात ११ जुलैपासून "डोअर टू डोअर' नेत्रदान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. दिशा ग्रुप, दिशा आय बँक विराग आर्टिस्ट ट्रस्ट याच्या संयुक्त विद्यमाने "रोशनी जिंदगी में’ या मोहिमेंतर्गत ११४ नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प घेतला आहे. तथापि, राज्यात ही मोहीम सुरू आहे. घरोघरी जाऊन परिवाराला नेत्रदानाची माहिती देऊन सदस्यांना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपकार्यक्रमचा उद्देश आहे. दरम्यान, या अभियानामुळे मृत्यूनंतर परिवारातील सदस्य नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतील. "रोशनी जिंदगी में’ अभियानांतर्गत दस्तूरनगर फरशी स्टॉप येथे ही मोहीम घेतली. घरोघरी जाऊन नेत्रदान अवयव दानाची माहिती दिशा ग्रुपच्या सदस्यांनी कुटुंबातील सदस्यांना दिली. या मोहिमेदरम्यान ११४ लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला. दर शनिवारी रविवारी अमरावतीमधील विविध भागांत ही "डोअर टू डोअर' मोहीम घेण्यात येईल, अशी माहिती दिशा ग्रुपचे सचिव स्वप्निल अरुण गावंडे यांनी दिली. या मोहिमेसाठी दिशा ग्रुपचे कार्यकर्ते हिमांशू बंड, रवींद्र जोगळेकर, नेहा जोगळेकर, स्नेहा चिंचोळकर, शुभम मेन, प्रियांका अवचार, शुभम भाकरे मंगेश बिल्गये ही मोहीम यशस्वीरीत्या राबवत आहेत.
वीकेंडला राबवणार मोहीम
दिशाग्रुप दिशा आय बँकेतर्फे विकेंडला शनिवारी रविवारी ही मोहीम राबवली जाईल. नेत्रदानानेे लोकांना दृष्टी मिळत असून, नेत्रादानाच्या संकल्पासाठी ही मोहीम राबवली जात आहे. मरणोत्तर नेत्रदानासाठी तोटे नेत्र रुग्णालयातील दिशा आय बँक येथे कळवावे. दिशा बँकेचे स्वप्निल गावंडे डॉ. सुनील शर्मा हे ऑनलाइन नेत्रदानाचा अर्ज भरणार आहेत.

संपूर्ण अमरावतीभर राबवणार अभियान
शनिवारी रविवारी राठीनगर ते पंचवटी हा परिसर निश्चित केला. जोपर्यंत शहरातील परिसर पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे अभियान सुरू राहील. हा ग्रुप शहरातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत हे अभियान सुरू राहील. शनिवारी रविवारी स्थळ निश्चित करून नेत्रदानसंदर्भात "डोअर टू डोअर'' जाऊन नागरिकांमध्ये जागृती करणार. स्वप्निल गावंडे,
बातम्या आणखी आहेत...