अमरावती- माहिती आणि जनसंपर्क विभागाअंतर्गत राज्यातील १२ जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यात चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांची भंडारा येथे, तर भंडाराच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांची वर्धा येथे, वर्धेचे अनिल गडेकर यांची नागपूर माहिती केंद्रात बदली झाली आहे.
या व्यतिरिक्त सोलापूरचे गोविंद अहंकारी यांची पुणे येथे, लातूरचे अ.पा. सूर्यवंशी यांची हिंगोली, मुंबई येथील माहिती विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालिका अर्चना शंभरकर यांची महान्यूज मुंबई येथे, हिंगोलीचे सु.आ. सोनटक्के यांची लातूरला, मुंबई येथील ग.व. मुळे यांची विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन, मुंबई येथील माहिती विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालिका मीनल जोगळेकर यांची प्रकाशन विभागात, पुणे येथील र.पा.राऊत यांची सोलापूरला, मुंबई येथील माहिती सहायक संचालक क्रि.अ.लाला यांची अधिपरिक्षक पुस्तके प्रकाशने मुंबई येथे बदली झाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करावे, असे अादेशही अव्वर सचिव रा. ना. मुसळे यांनी बदली आदेशात म्हटले आहे.