आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५१ जनावरे अन् १३३ बकऱ्या जप्त : वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे- येथीलपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या वनक्षेत्रात काठेवाडी मेंढपाळ अवैध चराई करून जंगलाचे नुकसान करतात. त्यामुळे जंगलाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. हा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वन विभागाच्या चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने कंबर कसली असून, वनक्षेत्रात होणाऱ्या अवैध चराईवर निर्बंध घालण्यासाठी गस्तीपथकाची नेमणूक करून चांदूर रेल्वे, चिरोडर, माळेगाव वन वर्तुळात रात्रंदिवस खडा पहारा ठेवला आहे. यात शुक्रवारी केलेल्या कारवाईमध्ये ५१ जनावरे अन् १३३ बकऱ्या जप्त केल्या आहेत.
अमरावती वन विभागांतर्गत दोन वर्षांपूर्वी नव्याने चांदूर रेल्वे वन परिक्षेत्राची निर्मिती करण्यात आली असून, या वर्तुळात चांदूर, आमला, जळका, कुऱ्हा, वऱ्हा, दत्तापूर, अशा एकूण सहा बीटचा समावेश आहे. अवैध चराईच्या नियंत्रणासाठी १८ बीटवर गस्त लावण्यात आली आहे.

हजार ८०७ हेक्टर क्षेत्र वनचराईसाठी
चांदूररेल्वे वर्तुळात क्षेत्रात २१४८.३५७ हेक्टर, चिरोडी वर्तुळात वर्ग क्षेत्रात १७८७.९६२ हेक्टर वर्ग क्षेत्रात ३५.२४२, असे १८२३.२०४ हेक्टर आणि माळेगाव वर्तुळात वर्गात ४८७.०६० हेक्टर वर्गात १३४८.९१० हेक्टर, असे १८३५.९७० हेक्टर असे एकूण हजार ८०७.५३१ हेक्टर क्षेत्र वनचराईसाठी आहे.

अवैधवन चराई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल : चांदूररेल्वे वनक्षेत्रात अवेध चराई करणाऱ्या मेंढपाळ काठेवाडींवर शुक्रवारी कारवाई करून वनगुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ५१ जनावरे १३३ बकऱ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी चांदूर रेल्वे कुऱ्हा पोलिस ठाण्याला तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. जप्त केलेली ११ मेंढरे बकऱ्या ५६ हजारांत हर्राशी करण्यात आल्याची माहिती चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...