आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 14 Farmers Committed Suicide In Yavatmal District

जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांनी जुलैमध्ये केल्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - चालू जुलै महिन्यात पावसाने दगा दिल्यानंतर आता दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले आहे. त्यामुळे मागील ४८ तासांत विदर्भात आणखी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बोरीअरबचे श्रीकृष्ण इंगळे, टाकळीचे भाऊराव बंडेकर बिटरगावचे राजाराम भलगे या तीन शेतकऱ्यांचा तर वाशीम जिल्ह्यातील काक येथील महिला शेतकरी दुर्गाबाई देशमुख मुंगडा येथील संदीप शेळके या दोन शेतकऱ्यांचा अमरावती जिल्हयातील पापडचे अजय खाप्रीकार यांचा समावेश आहे. जुलै महिन्यातच विदर्भात ३८ तर एकट्या यवतमाळ जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यातसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारी नोंद असून, यात जुलै महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाटखेड गावात एकापाठोपाठ एक दोन आत्महत्या झाल्या. सध्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारातही उभे करत नसून आतातर भारत सरकारच्या वतीने केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अढिया यांनी जुलै रोजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र लिहून राष्ट्रीयकृत बँकांना पीक कर्ज वाटपासाठी महाराष्ट्र सरकारने सक्ती करू नये, अशा सूचना राज्यातील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्याबाबत सुचवले आहे. यामुळे राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहे बँकांविरुद्ध कारवाई करू, अशी ओरड करणारे मंत्री आता यावर बोलण्यास तयार नाही, ही शोकांतिका असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

हमी भावच नसल्याने दिसताहेत परिणाम
खासगीसावकारांकडून खुल्या बाजारातून सुमारे २० लाख हेक्टरमधील केलेली पेरणी हातातून जात असल्यामुळे निराशेत शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारने पीक कर्जमाफी देण्याचे तसेच कापसाची सोयाबीनच्या अत्यल्प हमीभावाच्या घोषणेने परिस्थिती चिघळत आहे.