आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातामधील जखमी सख्ख्या भावांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील गजानननगरमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा शुक्रवारी उपचारादरम्यान नागपुरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी हे दोघे भाऊ दुचाकीने नागपुरातून शहरात येत होते. मार्गातील कारंजा घाडगेजवळ ते दोघेही जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी थोरल्याचा त्यानंतर चार तासांनी दुपारी धाकट्याचा मृत्यू झाला.

प्रमोदसिंग रामसिंग ठाकूर (३५) आणि संदीपसिंग रामसिंग ठाकूर (३२, दोघेही रा. गजानननगर, अशोक वाटिका, अमरावती) असे मृतक भावांचे नाव आहे. प्रमोदसिंग संदीपसिंग हे दोघे डिसेंबरला अमरावतीवरून नागपूरला दुचाकीने गेले होते. प्रमोदसिंग याचा पत्नीसोबत वाद अाहे. त्यांचे प्रकरण नागपूरच्या न्यायालयात प्रविष्ट आहे. डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्यासाठी प्रमोदसिंग गेले होते त्यांच्यासोबत संदीप गेले होते. हे दोघे भाऊ दर महिन्यालाच दुचाकीने नागपूरला जात होते. डिसेंबरला परतीच्या प्रवासात दोघेही गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यांना उपचारासाठी तातडीने कारंजाच्या ग्रामीण रुग्णालयात त्या ठिकाणाहून पुढील उपचारासाठी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी वाजतादरम्यान प्रमोदसिंग यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाठोपाठ चार ते पाच तासांनी संदीपसिंग यांनी अखेरचा श्वास घेतला.

घटनेचा सखोल तपास व्हावा
^संदीप सिंग आणि प्रमोदसिंग हे दोघे दुचाकीने नागपूरवरून येताना रस्त्यावर पडल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे अजूनही पुढे आले नाही. यामागे घातपाताची शक्यता असू शकते. त्यामुळे पाेलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे. विनोद ठाकूर, प्रमोदसंदीप यांचे बंधू.
बातम्या आणखी आहेत...