आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Years Belting Of 2 Person For Tiger Hunting Case

वाघ शिकारप्रकरणी दोघांना वर्षांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ढाकना वाघ शिकार प्रकरणी सहभाग असलेल्या शिरी चव्हाण भजन पवार या मध्यप्रदेशातील बहेलिया समाजाच्या अट्टल शिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माने यांनी शुक्रवारी (दि.२९) वर्षे सश्रम कारावास पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ढाकना वाघ शिकार प्रकरणातील हा सलग चौथा निकाल आहे. सदर प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींना नायालयाने शिक्षा सुनावली आहे. शिरी चव्हाण भजन पवार यांनी पंजाबमधील तस्कर रंजीत याला शिकार करण्याकरिता मध्यस्थी करून मधुसिंगला शिकारीसाठी मदत केली होती. मधुसिंग या प्रकरणातील मुख्य आरोपी होता.

शिरी चव्हाण भजन पवार या दोघांना मधुसिंग कडून यासाठी पाच हजार रुपये दिले होते. दरम्यान, शिरी चव्हाण भजन पवार यांचे वाघ शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला आहे. वाघ इतर वन्यप्राणी संदर्भात गुन्हे शोधणे, गुन्ह्याचा संपूर्ण तपास करणे शेवटपर्यंत या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करणे अशी यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे. कुट्टू या आतंरराष्ट्रीय वाघ शिकारीला पकडण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव गुन्हे शाखेनेच सीबीआयच्या मदतीने पकडले होते. यातूनच याचे महत्व स्पष्ट होते. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. उदय देशमुख यांनी युक्तिवाद केला.

तर तस्करीचे प्रमाण कमी होईल : वन्यजीवगुन्हे शाखा प्रत्येक ठिकाणी स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. याचा फायदा शिकार प्रकरणी होऊ शकतो. शासनाने प्रत्येक वन वृत्ताच्या मुख्यालयी अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव गुन्हे शाखेने यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जोपर्यंत अशा प्रकरणासाठी स्वतंत्र पद्धतीची यंत्रणा निर्माण होत नाही तोपर्यंत शिकार शिकाऱ्यांना आळा घालणे अशक्य आहे,असे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.