आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बसमध्ये बसवल्या तब्बल २०७ विद्यार्थिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शैक्षणिक सहलीसाठी जाणाऱ्या दोन खासगी बसेसची शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्यात तपासणी केली असता या बसेसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे तब्बल २०७ विद्यार्थिनी दाटीवाटीने प्रवास करीत असल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे विद्यार्थिनींच्या सहल वाहतुकीसंदर्भात शाळेने पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बसेस शाळेत परत पाठवून विद्यार्थिनींना खाली उतरवून बसमालकांवर दंडात्मक कारवाई केली. शनिवारी (दि. २५) सकाळी झालेल्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भातील नियम शाळेनेच वेशीला टांगल्याचे दिसून आले.
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात दरवर्षी नवनवीन नियम तयार होतात, विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, हा उद्देश समोर ठेवून शालेय परिवहन समिती तयार केली आहे. असे असताना शहरातील हाेलीक्राॅस शाळेने दोन बसेसमध्ये तब्बल २०७ बसेसमध्ये तब्बल २०७ विद्यार्थिनींना बसवून नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. होलीक्राॅस शाळेतील विद्यार्थिनींना विद्यापीठात असलेल्या एका कार्यक्रमासाठी घेऊन जायचे होते. विद्यार्थिनींना घेऊन जाण्यासाठी संबंधित शाळा प्रशासनाने दोन खासगी बसमध्ये या विद्यार्थिनींना बसवले होते. सदर बसेस इर्विनकडून गर्ल्स हायस्कूलच्या दिशेने जात असताना वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने त्यांच्या पथकाने या दोन्ही बसेस थांबवून त्यांची तपासणी केली. त्या वेळी दोन्ही बसमध्ये तब्बल २०७ विद्यार्थिनी होत्या.
या विद्यार्थिनींच्या सहल वाहतुकीसाठी पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती, तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनींची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही खासगी (बस क्रमांक एमएच २७ पी ४१११ आणि एमएच २७ पी २२११) बसेसविरुद्ध प्रत्येकी हजार ३०० रुपये दंड ठोठावला. तसेच या दोन्ही बसेस ज्या शाळेमधून आल्या होत्या, त्याच शाळेत परत पाठवून सर्व विद्यार्थिनींना बसमधून उतरवून सुरक्षित वाहतूक करण्याचे पोलिसांनी शाळा प्रशासनाला सांगितले.

होलीक्राॅस शाळेने परवानगी घेता ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मुलांना विज्ञान प्रदर्शनीसाठी नेण्याचा प्रयत्न केला असता वाहतूक पाेलिसांनी कारवाई करत संबंधित ट्रॅव्हल्स मालकाला दंड ठाेठावला. छाया: मनीष जगताप विद्यार्थिनींना बसवून नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. होलीक्राॅस शाळेतील विद्यार्थिनींना विद्यापीठात असलेल्या एका कार्यक्रमासाठी घेऊन जायचे होते. विद्यार्थिनींना घेऊन जाण्यासाठी संबंधित शाळा प्रशासनाने दोन खासगी बसमध्ये या विद्यार्थिनींना बसवले होते.
सदर बसेस इर्विनकडून गर्ल्स हायस्कूलच्या दिशेने जात असताना वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने त्यांच्या पथकाने या दोन्ही बसेस थांबवून त्यांची तपासणी केली. त्या वेळी दोन्ही बसमध्ये तब्बल २०७ विद्यार्थिनी होत्या. या विद्यार्थिनींच्या सहल वाहतुकीसाठी पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती, तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनींची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही खासगी (बस क्रमांक एमएच २७ पी ४१११ आणि एमएच २७ पी २२११) बसेसविरुद्ध प्रत्येकी हजार ३०० रुपये दंड ठोठावला. तसेच या दोन्ही बसेस ज्या शाळेमधून आल्या होत्या, त्याच शाळेत परत पाठवून सर्व विद्यार्थिनींना बसमधून उतरवून सुरक्षित वाहतूक करण्याचे पोलिसांनी शाळा प्रशासनाला सांगितले.

होलीक्राॅस शाळेने परवानगी घेता ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मुलांना विज्ञान प्रदर्शनीसाठी नेण्याचा प्रयत्न केला असता वाहतूक पाेलिसांनी कारवाई करत संबंधित ट्रॅव्हल्स मालकाला दंड ठाेठावला. छाया: मनीष जगताप

आरटीओ, ईओंना पाठवणार अहवाल
दोनखासगी बसमध्ये २०७ विद्यार्थिनी प्रवास करीत होत्या. या वाहतुकीसाठी परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे आम्ही दंड ठोठावला तसेच सदर प्रकाराबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना अहवाल देणार आहे. तसेच दोन्ही बसेसच्या परवाना निलंबनाचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवण्यात येणार आहे. आधारसिंगसोनोने, सहायकपोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा.