आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तालयातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत कार्यरत पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या २१ अधिकाऱ्यांच्या गुरुवारी (दि. २३) सायंकाळी सर्वसाधारण बदल्या झाल्या आहेत. सोबतच पाच पोलिस निरीक्षक, सहा सहायक पोलिस निरीक्षक १० उपनिरीक्षकांच्या बदल्यासुद्धा करण्यात आल्या आहेत.

यंदा आयुक्तालयाच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या नव्हत्या. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी आयुक्तालयाच्या आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या आधारे पोलिस आयुक्तांनी गुरुवारी २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांची गुन्हे शाखेला बदली झाली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव कोठून कोठे
दिगंबरनागे (पोलिस निरीक्षक) नियंत्रण कक्ष राजापेठ (गुन्हे)
गुलाबसिंग सोळंके (पोलिस निरीक्षक) नियंत्रण कक्ष फ्रेजरपुरा (गुन्हे)
शिशिर मानकर (पोलिस निरीक्षक) फ्रेजरपुरा नियंत्रण कक्ष
सतीश चिंचकर (पोलिस निरीक्षक) बडनेरा (गुन्हे) गाडगेनगर (गुन्हे)
प्रकाश आकोटकर (पोलिस निरीक्षक) नियंत्रण कक्ष पोलिस कल्याण शाखा
कांचन पांडे (सहायक पोलिस निरीक्षक) कोतवाली गुन्हे शाखा
रवी राठोड (सहायक पोलिस निरीक्षक) गुन्हे शाखा राजापेठ
सुरेश देसाई (सहायक पोलिस निरीक्षक) नियंत्रण कक्ष कोतवाली
कविता पाटील (सहायक पोलिस निरीक्षक) नियंत्रण कक्ष आर्थिक गुन्हे शाखा
बालाजी भंडे (सहायक पोलिस निरीक्षक) बडनेरा राजापेठ
संतोष सपाटे (सहायक पोलिस निरीक्षक) वलगाव नागपुरी गेट
नितीन थोरात (पोलिस उपनिरीक्षक) गुन्हे शाखा राजापेठ
बळीराम बंदखडके (पोलिस उपनिरीक्षक) राजापेठ बडनेरा
गौतम वावळे (पोलिस उपनिरीक्षक) राजापेठ बडनेरा
नीलेश पाटील (पोलिस उपनिरीक्षक) वाहतूक शाखा कोतवाली
सुनीता काळे (पोलिस उपनिरीक्षक) गाडगेनगर वाहतूक शाखा
विलास पवार (पोलिस उपनिरीक्षक) बडनेरा वलगाव
बळीराम राठोड (पोलिस उपनिरीक्षक) नियंत्रण कक्ष राजापेठ
वैशाली चव्हाण (पोलिस उपनिरीक्षक) राजापेठ विशेष शाखा
रामभाऊ गाढवे (पोलिस उपनिरीक्षक) भातकुली नियंत्रण कक्ष
कान्होपात्रा बन्सा (पोलिस उपनिरीक्षक) नियंत्रण कक्ष राजापेठ