आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 27 Advocates In Amravati Municipal Corporation For Avoiding Opposition

विरोध टाळण्यासाठी मनपात २७ वकिलांची फळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या पॅनलवर एक-दोन नव्हे, तर २७ विधिज्ञांची निवड झाल्यामुळे आता पालिकेशी संबंधित खटल्यांच्या सोडवणुकीला विलंब होणार नाही, अशी खात्री निर्माण झाली आहे. चंद्रकांत गुडेवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनपा प्रशासनात वेगवान बदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तुंबलेल्या खटल्यांची संख्या कमी करून ती निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विधी अधिकाऱ्याच्या नेमणुकीशिवाय पॅनलमधील वकिलांची संख्या वाढवण्याला जुने वकील बदलण्यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. मनपाने अलीकडेच घेतलेल्या एका निर्णयान्वये पॅनलवरील जुन्या वकिलांची सेवा मोडीत काढून त्याऐवजी नव्या दमाच्या वकिलांची फळी निर्माण केली आहे. दोन टप्प्यांत तयार करण्यात आलेल्या या चमूत २७ विधिज्ञ आहेत. पहिल्या टप्प्यात ही संख्या दहा होती. त्यानंतर एकाच वेळी १७ नवीन विधिज्ञ नेमल्या गेलेत. त्यामुळे एकूण संख्या २७ वर पोहोचली आहे.

वकिलांची एवढी मोठी फळी तयार झाल्यामुळे मनपाच्या विरोधात खटले दाखल करणाऱ्यांवर अंकुश लागला असून, छोट्या-मोठ्या अडचणींसाठी मनपाला न्यायालयात आव्हान देणाऱ्यांची संख्याही भविष्यात घटणार आहे. शिवाय नव्याने दाखल होणारे खटले प्रलंबित प्रकरणे यांचा निकाल लागण्यासही मदत होणार आहे.

मनपाने कमी केली विरोधकांची संख्या : मनपाच्यापॅनलवर २७ वकिलांची नेमणूक करून मनपाने विरोधक कमी करण्याचा उद्देशही पूर्ण केला आहे. कारण ज्या वकिलांना पॅनलवर नेमले गेले, त्यांना मनपाच्या विरोधातील खटला घेता येत नाही. त्या अर्थाने आपले विरोधकच कमी केले आहेत.

६० उमेदवार होते रिंगणात
पॅनलवरील वकिलांची संख्या वाढवण्याशिवाय मनपाने अलीकडेच विधी अधिकाऱ्याचीही नियुक्तीही केली. परीक्षा मुलाखत अशा दोन टप्प्यांत ही संपूर्ण प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण केली गेली. त्यासाठी सुमारे ६० उमेदवार रिंगणात होते.