आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीची छेड काढणाऱ्याला तीन वर्षांची सुनावली शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या एका गावातील १७ वर्षीय युवतीची अडीच वर्षांपूर्वी गावातीलच एकाने छेड काढली होती. त्या वेळी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार झाली गुन्हा दाखल झाला. सबळ पुराव्यावरून न्यायालयाने शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी आरोपीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मनीष ऊर्फ मनोहर देवीदास मोडक (वय ३२), असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका १७ वर्षीय युवतीच्या घरात जाऊन तिच्यासोबत असभ्य वर्तन केले होते. ही घटना २८ एप्रिल २०१३ ला घडली होती. तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसात मनोहर मोडक विरुद्ध विनयभंग बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे डिसेंबर २०१३ मध्ये पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एस. डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात सुरू झाली. मनीष हाच मनोहर असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे न्यायालयाने मनीष ऊर्फ मनोहरला शुक्रवार, २० नोव्हेंबरला दोषी ठरवून तीन वर्षे शिक्षा तीन हजार रुपये दंड सुनावला. दंड भरल्यास अतिरिक्त शिक्षा सुनावली होती, अशी माहिती विधी सूत्रांनी दिली आहे.