आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 42 Candidates For The 18 Directors In Election Rounds

१८ संचालकांसाठी ४२ उमेदवार रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघात असून, जागांसाठी १७ उमेदवार आहेत.
निवडणुकीसाठी ८१ नामांकन ग्राह्य धरण्यात आले होते. सोमवारी ३९ नामांकन परत घेण्यात आले. त्यामुळे ४२ उमेदवार आता रिंगणात राहिले आहेत. सेवा सहकारी मतदारसंघातील सर्वसाधारण गणातून ३३ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्याने १७ उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रवर्गातून सहापैकी दोन नामांकन परत गेल्याने उमेदवार आहेत.
निवडणूक रिंगणात ओबीसी प्रवर्गातून ३, एनटी प्रवर्गातून उमेदवार मैदानात आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गातून १६ पैकी १० नामांकन मागे घेतल्याने उमेदवार रिंगणात आहेत. एससी प्रवर्गातून तर आर्थिक दुर्बल प्रवर्गातून नामांकन आहेत. व्यापारी मतदारसंघातून पैकी नामांकन मागे घेण्यात आल्याने उमेदवार मैदानात आहेत. या मतदारसंघातून श्याम मालू उच्च न्यायालयात गेले आहेत. हमाल मतदारसंघातून पैकी नामांकन मागे घेण्यात आले.

रिंगणात असलेले उमेदवार : सर्वसाधारण मतदार संघातून अजय पाटील, दिलीप अपाले, आनंद धुरधळ, गजानन भोरे, अशोक जवंजाळ, भय्या लहाने, चंद्रकांत म्हला, छाया काळे, किरण शेळके, गंगाराम काळे, शिवाजी चित्रकार, तर ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून दिलीप पडोळे, मनोहर जाधव, सुधीर रहाटे, सुषमा थोरात, सतीशकुमार व्यास, बंडू अग्रवाल, सहकार पॅनेलचे विजय काळे, बाबूराव गावंडे, दीपक चऱ्हाटे, संजय चरोटे, अमोल चिमोटे, दीपक पाटील, रवींद्र पाटील, अभिजित हरणे, वर्षा पवित्रकार, उषा सगणे, गंगाधर चौधरी, साधुराम येवले, अजय उभाड, राजेंद्र गोरले, आनंद गायकवाड, अश्विनी तायडे, सदानंद जयस्वाल, रमेश मडघे, बाळकृष्ण धुटाळे, संदीप ठाकरे, राजेंद्र मुंदे, विनायक सरदार, व्यापारी मतदारसंघातून गोविंद सिरोया, हमाल मापारी मतदारसंघातून पोपट घोडेराव, शेख हबीब शेख हसन उमेदवार रिंगणात आहेत.

आज होणार चिन्हांचे वाटप
अचलपूरकृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारांना मंगळवारी चिन्हांचे वाटप होणार आहे.