आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरजगाव येथे साडेचारशे विद्यार्थ्यांनी दिली स्पर्धा परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परीक्षा देताना व‍िद्यार्थी. - Divya Marathi
परीक्षा देताना व‍िद्यार्थी.
शिरजगाव कसबा - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती होऊन जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासनात दाखल व्हावेत, या उद्देशाने येथील ग्रामपंचायत एका अकादमीच्या संयुक्त व‍िद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. २६) श्री बाल मुकुंद राठी विद्यालयात सकाळी दहा वाजता पार पडलेल्या परीक्षेमध्ये परिसरातील साडेचारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये असलेली स्पर्धा परीक्षेची भीती न्यूनगंड घालवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या वयोगटातील मुलामुलींनी परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला. अ, ब, अशा तीन गटांमध्ये परीक्षा घेण्यात आली. स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून, रविवारी घेतलेल्या परीक्षेमध्ये ८० टक्क्यांच्यावर गुण म‍िळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. शिवाय तीनही गटांमधून प्रथम, द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर सुने, सरपंच अविनाश बदुकले आदींनी परीक्षा केंद्राना भेट दिली. परीक्षसाठी अकादमीची चमू, ग्राम पंचायत सदस्य, श्री बालमुकुंद राठी विद्यालय, जनता विद्यालयाच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण सोहळा १५ ऑगस्टला होणार आहे.

मुले गावाचे नाव उज्ज्वल करतील
मुलांना शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची गोडी लागली, तर ग्रामीण विद्यार्थीही त्यामध्ये मागे राहणार नाहीत. प्रशासकीय सेवेत ठसा उमटवून गावाचे नाव मोठे करतील.- श्रीकृष्णआवारे, सदस्य.
व‍ि‍द्यार्थ्‍यांना होणार फायदा
शालेय जीवनातील या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात फायदाच होणार आहे. या परिक्षांद्वारा होणारा सराव त्यांच्यामध्ये आत्मिविश्वास निर्माण करणारा आहे.
- सुनील मेंगजे, पालक.