आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती शहरामध्ये 7 हजार 50 घरकुले मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती महापालिका क्षेत्रात हजार ५० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या योजनेकरिता १७५.५० कोटी रुपयांचा निधी १६ मार्च राेजी देण्यात आला. यामुळे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले अाहे. ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेचा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी वेळोवेळी आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नाला यश आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हजार ५० घरे शासनाकडून मंजूर करण्यात आले.
इतक्या मोठ्या प्रमाणात घरे मंजूर झालेली अमरावती ही राज्यातील पहिली महापालिका आहे. निधी उपलब्ध झाल्याने गोरगरिबांचे आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार असून, यामध्ये ३५० फुटांचे घर मिळणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी १२ मार्चला अमरावती महानगरपालिकेत जाऊन सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अवघ्या एका दिवसात डीपीआर तयार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...