आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दृष्टिहीन जलतरणपटूंनी पटकावले २६ पदके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांसह अन्य दोन अशा आठ दृष्टिहीन जलतरणपटूंनी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तब्बल २६ पदकांची कमाई केली आहे. या सुवर्णमय कामगिरीने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या आठही जलतरणपटूंची निवड बेळगाव येथे २८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
पॅराऑलिम्पिक स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राद्वारे आयोजित अपंगाची राज्यस्तरीय वी जलतरण स्पर्धा औरंगाबादला पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून १७० च्या आसपास स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत जलतरणाच्या चार प्रकारांत अमरावतीच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली. अमरावतीच्या जलतरणपटूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे आठही जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, विजयी खेळाडू प्रशिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.

पदक विजेते गोल्ड सिल्व्हर ब्रांझ एकूण
एकनाथ अमझरे ००
श्रेया देशमुख ०० ००
शैलेश कास्देकर ००
किरण चव्हाण ००
अमित भाकरे
अंकुश अंबलकार
मेघराज जाधव ०० ००
आनंद बारस्कर ०० ००
प्रशांत गाडगे प्रशिक्षक

स्पर्धेची तयारी सुरू
अमरावतीच्या जलतरणपटूंची आजवरची उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता प्रशिक्षक प्रशांत गाडगे यांची बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. गाडगे यापूर्वी केवळ जलतरणपटूंना मार्गदर्शन करीत हाेते.

^राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत आमच्या स्पर्धकांनी एकूण २६ पदके पटकावली आहेत. हव्याप्र.मंडळ नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाची आम्हाला मदत झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत अधिक पदकांसाठी तयारी सुरू आहे. प्रशांतगाडगे, प्रशिक्षक.