अमरावती- एचव्हीपीएमला लागून असलेल्या अंबर अपार्टमेंटमधील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी तब्बल ३१७ ग्रॅम सोन्याचे दागिने ३५ हजारांची रोख असा लाख ७० हजारांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी (दि. १६) रात्री ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत चोरटे गवसले नव्हते. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत पसरली आहे.
बकारामजी सखारामजी खराते (७४, रा. अंबर अपार्टमेंट, अमरावती) असे सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव आहे. बकारामजी खराते हे एचव्हीपीएमलाच प्राध्यापक होते. एचव्हीपीएमलाच लागून असलेल्या अंबर अपार्टमेंटमध्ये त्यांचा फ्लॅट आहे. तसेच खराते यांचा मुलगा प्राध्यापक आशिष यांचे घर प्रशांतनगरमध्ये आहे. मागील काही दिवसांपासून बकारामजी खराते हे अधूनमधून मुलांकडेच राहायचे, दरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने सध्या ते प्रशांतनगरलाच आहे. शनिवारी (दि. ११) ते अंबर अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये गेले होते. मात्र, त्या दिवसापासून फ्लॅट बंदच होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी प्रा. आशिष खराते यांना अंबर अपार्टमेंटमधील एका परिचिताचा फोन आला. तुमच्या फ्लॅटचे दरवाजे उघडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चोरी झाल्याची शंका खराते कुटुंबीयांना आली. त्यामुळे त्यांनी फ्लॅटवर जाऊन पाहणी केली असता. फ्लॅटचे दार उघडे होते, घरातील लोखंडी कपाट फोडून आतमधील लॉकर फोडले त्यामध्ये असलेले सोन्याचे तब्बल ३१७ ग्रॅमचे दागिने लंपास केले तसेच त्याच ठिकाणी असलेली ३५ हजारांची रोखसुद्धा चोरट्यांनी पळवली आहे. यामध्ये रोख सोन्याचे दागिने असा जवळपास लाख ७० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही चोरी ११ ते १६ जूनदरम्यान चोरट्यांनी केली आहे. चोरीची माहिती मिळताच जापेठचे प्रभारी ठाणेदार शिशिर मानकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी श्वानपथक ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. तसेच पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, डीसीपी मोरेश्वर आत्राम, एसीपी रियाजोद्दीन देशमुख यांनीसुद्धा पाहणी केली.
चोरीलागेलेले दागिने : मोहनमाळ- ५० ग्रॅम, चपळाकंठी - ५० ग्रॅम, सोन्याची पोथ - १० ग्रॅम, बिऱ्या - ग्रॅम, सोन्याच्या पाटल्या - ४० ग्रॅम, कडे - ४० ग्रॅम, सोनसाखळी - १५ ग्रॅम, अंगठ्या - १९ ग्रॅम, टॉप्स - १० ग्रॅम, मंगळसूत्र - ३५ ग्रॅम, नेकलेस - ६० ग्रॅम तसेच चांदीच्या २०० तोड्याच्या बांगड्या ३५ हजारांची रोख.
यापूर्वीच्याचोऱ्यांचाही सुगावा नाही : राजापेठपोलिस ठाण्याच्या हद्दीत २० ते २५ दिवसांपूर्वी एकाच दिवशी तब्बल सहा घरे चोरट्यांनी फोडून १० ते १२ लाखांचा ऐवज लंपास केला होता. तसेच दोन महिन्यांपूर्वी एकाच दिवशी घरांमध्ये चोरी झाली होती. मात्र, शहर पोलिसांना अजूनही त्या चोरट्यांना शोधण्यात यश आले नाही तोच, पुन्हा पावणे आठ लाखांची चोरी झाल्याने शहरातील घरे सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
तपाससुरू आहे : चोरीझाल्याचे गुरुवारी उघड झाले आहे. आम्ही वरिष्ठांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. चोरट्यांनी फ्लॅटचे मुख्य कुलूप तोडून आंत प्रवेश करून घरफाेडी केली आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही तसेच गुन्हे शाखासुद्धा करत आहे. लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल,असे राजापेठचे प्रभारी ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.