आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी ट्रॅक्टर मिळणार ९० टक्के अनुदानावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांतील शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहे. या अंतर्गत शेती व्यवसायासाठी या घटकांतील शेतकऱ्यांना अनुदानावर यंत्रसामग्री साहित्य उपलब्ध करून दिले जाते. या मोहिमेअंतर्गत सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर त्यांच्या इतर साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीकृत बचत गटांकडून १० नोव्हेंबरपर्यंत अर्जही मागवण्यात आले आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाच्या स्वयंसाहायत्ता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावे. मिनी ट्रॅक्टर त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३.५० लाख रुपये राहील. गटाने या रकमेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के म्हणजेच ३.१५ लाख रुपये शासकीय अनुदान संबंधित बचत गटाला मिळणार आहे. याव्यतिरिक्त अटी शर्तीबाबतच्या माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे, अमरावती कार्यालयाशी संपर्क साधून विहित अर्जाच्या नमुन्यासह प्रस्ताव १० नोव्हेंबरपर्यंत कार्यालयात प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...