आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 97 Percent Voting In Achalpur Agriculture Produce Market Committee

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या न‍िवडणुकीत ९७ टक्के मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अचलपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर लागलेली रांग. - Divya Marathi
अचलपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर लागलेली रांग.
परतवाडा - अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी रविवारी (दि. २६) घेण्यात आलेल्या न‍िवडणुकीत ९७ टक्के मतदान झाले. एकूण आठ मतदान केंद्रांवर दोन हजारांपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. १७ जागांसाठी न‍िवडणूक र‍िंगणात उतरलेल्या ४१ उमेदवारांचे भाग्य रविवारी सायंकाळी मशीनबंद झाले असून, सोमवारी (दि. २७) सकाळी वाजतापासून बाजार समितीच्या चिली गोदामात मतमोजणी होणार आहे.
सेवा सहकारी सोसायटीच्या ६३९ पैकी ६३२ मतदारांनी आपल्या मतांचा वापर केला. ग्राम पंचायत मतदार संघातील सर्वच म्हणजे ६२२ मतदारांनी मतदान केले. अडत्या व्यापारी मतदार संघातील ४४५ पैकी ४१८ मतदारांनी, तर हमाल मापारी मतदार संघातील ५६९ पैकी ४८६ मतदारांनी मतदान केले. सर्वच मतदार संघातील मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केल्याने कृउबासची निवडणूक चुररशीची झाल्याचे चित्र आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीसाठी परतवाडा येथे बाजार समितीच्या वेगवेगळ्या दालनात चार मतदान केंद्र ठेवण्यात आले होते, तर पथ्रोट असदपूर येथे प्रत्येकी दोन असे एकूण आठ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. पन्नासच्या जवहपास कर्मचाऱ्यांनी या मतदान कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश भुयार यांनी सांगितले.
उमेदवार विसरले मतदान केंद्र
सेवासहकारी मतदार संघातून अपक्ष उमेदार बाळकृष्ण थुहारे यांना आपले मतदान कुठे आहे, हेच माहित नसल्याचा प्रकार मतदानादरम्यान उघडकीस आला. ते थेट ग्राम पंचायत मतदार संघाच्या मतदान केंद्रावर आले. योदीत नाव नसल्याने चुकून येथे आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चर्चेेमध्ये "शिट्टी'
ग्रामपंचायत मतदार संघातील अपक्ष उमेदवारा राजू मुंदे यांचे निवडणूक चिन्ह शिट्टी होते. निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी पोलिस कर्मचारी शिट्टी वाजवत होते. तेव्हा मुंदे यांच्या चिन्हाचा प्रचार होत असल्याची गमतीने सुरू होती.
समता सहकारमध्ये चुरस
बाजारसमितीच्या एकूण १८ जागांपैकी एका जागेवर अपक्ष कुलदीप काळपांडे यांची न्यायालयातून अविरोध निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात होते. काही अपक्ष उमेदवारांनी समता सहकार पक्षाच्या उमेदवारांना समर्थन दिले होते. समता सहकार या पॅनेलमध्येच ही निवडणूक रंगली.
वाहनांचा मोठ्या प्रमाणात करण्यात आला वापर
बाजारसमितीसाठी आठ मतदान केंद्रावर मतदानासाठी ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी सोयायटीचे सदस्य इतर सदस्यांसाठी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे परतवाडा-अमरावती मार्गावरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारांपुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आज मत मोजणी
बाजारसमितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतदानाची मतमोजणी सोमवारी (दि. २७) सकाळी नऊ वाजतापासून सुरू होईल. बाजार समितीवर कोण वर्चस्व मिळवतो याचा फैसला मतमोजणीनंतरच होईल.