आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेकमुळे अपघात १९ जण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड- माेर्शी मार्गावरील लाखारा फाट्याजवळ मालवाहू ऑटोला पिकअप वाहनाने ओव्हरटेक केल्यामुळे झालेल्या अपघातात १९ जण गंभीर जखमी झालेे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता घडली.

 

सुदैवाने या अपघातामध्ये काेणतीही प्राणहानी झाली नाही. सर्व जखमींना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टोंगसे, मदन बेलसरे, सुरेश हरले, प्रदीप दारोकर, बाबाराव पोकळे, राजेश बेहरे, सुधाकर कोल्हे, आकाश उईके, अशोक राऊत, देविदास सुरजुसे, ज्ञानेश्वर सहातपुरे, रमेश सहातपुरे, प्रदीप बेले, अनिल वसुले, अतुल टोंगसे, धनराज दंडाळे, कांता गणपत सुरजुसे, शालिनी प्रवीण हिवसे, ज्योती सुमित सिरसाम सर्व रा. जरुड अशी जखमींचे नावे आहेत. घटनेच्या वेळी सर्व जखमी जरुड येथे पाळा येथे संत्रा तोडीसाठी चालले होते. दरम्यान, लाखारा फाट्याजवळ मालवाहू ऑटोला (एमएच २७/ २२७५) पिक अप वाहनाने ओव्हरटेकचा प्रयत्न केला. मात्र समोरून मोठे वाहन आल्यामुळे िपक अप वाहनाच्या (एमएच २७/ एक्स ७९६३) चालकाचे संतुलन बिघडले. त्यातच पिक अप मालवाहू ऑटोवर पलटी झाले. या प्रकरणी रविशंकर धुर्वे (३०) रा. वरुड यांच्या तक्रारीवरून आरोपी यशवंत पोकळे, रा. जरुड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास बेनोडा शहीद पोलिस करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...