आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या आत्महत्येवरील लघूपट बर्लिन फेस्टिव्हलमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव- राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित लघुपट बर्लिन चित्रपट महोत्सवात हजेरी लावणार आहे. 'अवसान' नामक या लघुपटाने या महोत्सवाच्या तांत्रिक फेरीचे निकष पूर्ण करत पुढील वाटचाल सुरू केली आहे. महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील करपे या शेतकऱ्याच्या आयुष्यावर अाधारित हा लघूपट आहे. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून साहेबराव यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. या फेस्टिव्हलचा प्रथम पायलट टेक्निकल राऊंडचे निकष पूर्ण करणारी 'अवसान' ही फिल्म ठरली. बर्लिन फेस्टिव्हल जानेवारी २०१८ मध्ये या फिल्मची हजेरी पक्की झाली. 

 

भारतातील विशेषत्वाने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय निवडला. ग्रामीण भागातील हा प्रश्न मांडताना माध्यमाचे लक्ष नसणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी, कुटूंबियांची हिंमत 'अवसान' या लघुफिल्ममधून मांडला. अवसान बर्लीन फेस्टिव्हलसह २०१८ मध्ये लंडनच्या डिजिटल थिएटरमध्ये इंडियन मुव्हीज फ्रेंडसमधून दाखवणार आहे. या थिएटरमध्ये दाखवण्यात येणारी ही पहिली भारतीय लघु फिल्म आहे. अवसान ही लघुफिल्म राजनंदा प्रोडक्शनची लघु फिल्म आहे. निर्माता कॅरोली ड्रॅझलिक हे आहेत. लेखक अभिषेक शिवाल, दिग्दर्शन अभिषेक कोळगे, कैमरा अनिकेत खंडागळे यांचे आहे. यात किशोर कदम, विना जामकर, शुभम परब, मृणाल जाधव, बाल कलाकार आरोही पाटील, पुष्पा जाधव यांच्या भूमिका आहेत. अविनाश कांबळे, सागर वंजारी, विजय गावंडे, संकेत धुतकर यांनी इतर कामे केली. 

 

पत्नी, मुलांसह केली होती आत्महत्या : चिलगव्हाण (ता. महागाव) येथील साहेबराव पाटील करपे यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून १९ मार्च १९८६ रोजी पवनार (जि. वर्धा) येथील आश्रमामध्ये पत्नी,दोन मुली, मुलासह सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेची राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद आहे. 

 

प्रवास पूर्ण करण्यासाठी अनेकांची िमळाली मदत 

साहेबराव करपे पाटील हे नाव समजायला मला कमी वेळ लागला. माझा प्रवास हा मराठवाडा ते विदर्भ एवढाच होता. लातूर ते चिलगव्हाण ३०० ते ३५० किलोमीटरवरील गाव, पण हा प्रवास पूर्ण करण्यासाठी खूप लोकांनी मदत केली. विदर्भात ना कोणी ओळखीचे नव्हते, ना काही माहित होतं. या लघु फ्लिमच्या स्टोरीसाठी काही महिन्यापूर्वी यवतमाळमध्ये आलो. तिथून माझा खरा प्रवास सुरु झाला. मी तिथं जाण्याच एक कारण होतं, ते म्हणजे विवेक गावंडे, त्यांची भेट घेतली. नंबर शोधण्यापासून ते भेटण्यापर्यंत मदत झाली. त्यानंतर मदतीचे हात पुढे येऊ लागले, सर्वांनी मला या संदर्भात मदत केली, असे चित्रपटाचे लेखक डॉ .अभिषेक शिवल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...