आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० वेळा कागदपत्र देऊनही शेतकरी अपघात विम्यासाठी हेलपाटे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शासन गतिमान असून शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असल्याचे म्हटले जाते. परंतु तब्बल २० वेळा शेतकरी अपघात विम्याचा लाभ मिळावा यासाठी कागदपत्रांची पूर्तता करूनही वर्ष उलटले तरी मासोद (ता. जि. अमरावती) येथील गिरीश हरिश्चंद्र चौधरी या युवकाचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे संपले नाही. दरम्यान विम्याचा लाभ त्वरित न मिळाल्यास नाइलाजाने उपोषणाला बसावे लागणार असल्याची हतबल व्यथा गिरीशने मांडली आहे. 

गिरीशचे वडील हरिश्चंद्र चौधरी यांचा ९ फेब्रुवारी २०१७ रोजी ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला. गिरीशकडे केवळ चार एकर कोरडवाहू शेत आहे. त्यानंतर गिरीशने स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केला होता. ५ मे २०१७ रोजी सदर अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला मिळाला. यासाठी अर्जासोबत गिरीशने २२ विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे दिव्य पार पाडले होते. परंतु तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने मात्र ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असताना नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा अर्ज भरून घेण्याचा गलथानपणा केला. त्यानंतर चूक लक्षात आल्यावर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या नावे अर्ज सादर करण्यात आला. यासाठी पुन्हा गिरीशला नव्याने कागदपत्रे सादर करावे लागले. या अर्जासोबत गाव नमुना ६-क ची मूळ प्रत सादर करणे आवश्यक आहे. पहिल्या अर्जापासून गिरीशने ६-क ची प्रत सादर केली. त्यानंतर वर्षभरात सुमारे २० वेळा त्याने विविध कागदपत्र कधी कृषी अधिकारी कार्यालय तर कधी विमा कंपनीला सादर केले. परंतु अनेक वेळा ६-क ची प्रत सादर करूनही विमा कंपनीकडून ६-क च्या त्रुटीचे स्मरणपत्र पाठवण्यात आले. स्मरणपत्र पाठवून सात दिवसांच्या आत त्रुटी पूर्ण करण्याचे या पत्रात म्हटले होते. परंतु विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०१७ ला पत्र काढल्याची तारीख स्मरण पत्रावर नमूद केली आहे. 

कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास 

विम्याचा लाभ मिळावा यासाठी मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. परंतु विमा कंपनीने मात्र उपचाराचेही कागदपत्रे सादर करण्यास लावले. अपघातानंतर गिरीशच्या वडिलांवर वर्धा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी गिरीश यांना जिवाचे रान करावे लागले. यासोबतच अनेक कागदपत्रांची गरज नसताना कृषी विभाग व विमा कंपनीने कागदपत्र अनेक वेळा सादर करण्यास लावून मानसिक त्रास दिल्याचे गिरीश यांनी म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...