आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंड गावात अग्नितांडव; 19 शेळ्यांचा होरपळून मृत्यू, सात घरे जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचशे लोकवस्तीच्या कुंड (खुर्द) गावात गुरूवारी (दि. २६) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका गोठ्यातील १९ शेळ्यांचा जळून कोळसा झाला. तसेच परिसरातील सहा घरेही जळाले आहेत. दरम्यान, आग लागल्यानंतर जीव वाचवण्याच्या आकांताने शेळ्यांनी प्रचंड आरडाओरड केली. यावेळी शेळ्या का ओरडतात म्हणून परिसरातील नागरिकांना जाग आली व बाहेर येवून पाहिले तर काय, त्यांच्याही घरांना आगीने वेढले होते. नागरिक कसेबसे स्वत:चे प्राण वाचवून घराबाहेर पडले मात्र सहा घरातील साहित्याची राखरांगोळी झाली आहे. दरम्यान आग लागण्याचे कारण दुसऱ्या दिवशीही समोर आले नव्हते. 


कुंड खुर्द येथील रहिवासी विठ्ठलराव रंगारी यांच्याकडे २५ शेळ्या होत्या. गुरूवारी बडनेरा येथे रंगारी त्यांच्या कुटूंबासह अंत्यविधीसाठी गेले होते. घराशेजारी असलेल्या गोठ्यात त्यांच्या शेळ्या बांधल्या होत्या. घरी कुणीही नसल्यामुळे त्यांनी गोठ्याला कुलूप लावले होते. दरम्यान रात्री साडेबाराच्यसुमारास अचानकपणे त्यांच्या गोठ्यातील शेळ्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरात राहणारे अशोक बोरकर, दादाराव बोरकर व परिसरातील अन्य घरातील नागरिक तातडीने घराबाहेर आले तर रंगारी यांच्या गोठ्यासोबतच परिसरातील सहा घरे तसेच एक दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या आगीत अशोक दत्ताजी बोरकर, दादाराव दत्ताजी बोरकर, नामदेवराव गजभिये, बबन सुखदेवराव हरणे आणि बकुबाई सोमाजी बोरकर यांचे घर व घरातील साहित्य जळून खाक झाले आहे तसेच दामोदर महादेवराव मेश्राम यांचे दुकान व दुकानात विक्रीसाठी असलेला किराणा तसेच फ्रीज जळून खाक झाला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी वलगाव पोलिसही गावात पोहचले. त्यानंतर पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडीत, भातकुलीचे तहसीलदार डॉ. अजीत येळे यांनी घटनास्थळी भेट दिली. 


तातडीने आर्थिक मदत पोहोचवणार 
बुधवारी मध्यरात्री कुंड गावात आग लागल्यामुळे शेळ्यांचा मृत्यू झाला तसेच घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ग्रामस्थांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच नुकसान झालेल्या ग्रामस्थांसाठी शासकीय धान्य दुकानातून धान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- डॉ. अजित येळे, तहसीलदार, भातकुली. 

बातम्या आणखी आहेत...