आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने गावातील मुलीसोबत पळून जावून केले लग्न...दलित महिलेच्या घराला लावली आग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मुलाने गावातील मुलीसोबत पळून जावून लग्न केल्याने दलित महिलेच्या घराला एकाने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्याअंतर्गत कवाडगव्हान गावात ही घटना घडली आहे. आगीत दलित महिलेच्या घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या प्रकरणी तिवसा पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, बेबी लक्ष्मण मेंढे (वय-49) असे दलित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी गणेश चपंत काळे (रा.कव्हाडव्हान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी महिलेच्या मुलाने गावातील मुलीसोबत पळून जावून लग्न केले होते. यावरून गणेश काळे याने शुक्रवारी रात्री बेबी मेंढे यांच्या घराला आग लावली. आगीत घरातील उपयोगी वस्तू, धान्य जळून खाक झाले आहे. पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गणेश काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न...
महिला अनेक वर्षांपासून गावात राहते. ती गावातीलच अंगणवाडी मदतनीस म्हणून काम पाहते. तिच्यावर बहिष्कार टाकण्यासाठी कव्हाडगव्हान स्थानिक ग्रामपंचायतने तिला मदतनीस म्हणून काढून टाकण्याचा ठराव तयार केल्याचे दलित महिलेने सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...