आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोरवयीन मुलीवर चाकूच्या धाक दाखवून बलात्कार, पीडिता 7 महिन्यांची गरोदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीवर परिसरातीलच एका तरुणाने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता. पीडिती मुलगी आता सात महिन्यांची गरोदर आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून नागपूरी गेट पोलिसांनी गुरूवारी अल्पवयीन तरुणाविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देणे तसेच विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

 

मुलीने तिच्या आई-वडिलांना आपबिती सांगितली. दरम्यान, तेव्हा उशीर झाला होता. त्यावेळी पीडिता दोन महिन्यांची गरोदर होती. पीडितेचे आई-वडील मुलाच्या घरी गेले. त्यांनी मुलाच्या वडीलांना मुलाने केलेल्या कृत्याबाबत सांगितले. मुलाच्या वडीलांनी सर्व आरोप फेटाळून पीडितेच्या आई-वडिलांना घरातून हाकलून दिले होते. असे पीडीतेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पीडितेच्या आई वडीलांनी मुलाची भेट घेतली. त्यावेळी त्याने पीडितेसोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे मुलीसह तिच्या पालकांनी त्या मुलावर विश्वास ठेवला. मात्र, त्याने त्यानंतरही अनेकदा सदर पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान मुलगी सात महिन्यांची गरोदर झाल्यानंतर पीडितेच्या कुटूंबियांनी त्या मुलाला लग्नासाठी विचारणा केली असता त्यावेळी त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणी पीडित गर्भवती अल्पवयीन मुलीने गुरूवारी नागपूरी गेट पोलिस ठाणे गाठून अल्पवयीन तरुणाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अशी माहीती नागपूरी गेट पोलिसांनी दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...