Home | Maharashtra | Vidarva | Amravati | Rude behavior With Female Doter After engagement in Amaravati

साखरपुड्यानंतर डॉक्टर तरुणीसोबत असभ्य वर्तन, हुंडा मागून डॉक्टरने दिला लग्नास नकार

प्रतिनिधी | Update - Aug 21, 2018, 10:35 PM IST

चिखलदऱ्यावरून परत आल्यानंतर त्याने पाच लाख रुपये आणखी हुंडा मागितला.

  • Rude behavior With Female Doter After engagement in Amaravati

    अमरावती- शहरातील एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा डॉक्टर असलेल्या तरुणासोबत तीन महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. तरुणीला चिखलदऱ्याला फिरण्यासाठी त्या डॉक्टर तरुणाने तगादा लावल्यामुळे तरुणी त्याच्यासोबत गेली. दरम्यान त्याठिकाणी त्याने तरुणीसोबत असभ्य वर्तन केले. तसेच पाच लाख रुपये आणखी हुंडा दिला तरच लग्न करेल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे डॉक्टर तरुणीने त्याच्याविरुद्ध मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या डॉक्टर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    वर्धा जिल्ह्यातील रहीवासी डॉ. आशिष रमेश करोडे याच्यासोबत तरुणीचे लग्न ठरले होते. दरम्यान 27 मे 2018 ला थाटामाटात त्यांचा साखरपुडा शहरातील एका हॉलमध्ये पार पडला होता. 9 नोव्हेंबर 2018 चा लग्नाचा मुहूर्तही काढण्यात आला होता. याच दरम्यान डॉ. आशिषचा तरुरीला फोन आला व चिखलदरा येथे सहलीला चलण्यासाठी त्याने आग्रह केला. यावेळी तरुणीनेही होकार दिला. त्यामुळे डॉक्टर तरुण व तरुणी 22 जुलैला चिखलदऱ्याला सहलीसाठी गेले. त्याठिकाणी डॉ. आशिषने आपल्यासोबत असभ्य वर्तन केले, असा आरोप डॉक्टर तरुणीने केला आहे.

    चिखलदऱ्यावरून परत आल्यानंतर त्याने पाच लाख रुपये आणखी हुंडा मागितला. वास्तविकता पुर्वीच दोन लाख हुंडा व तीन तोडे सोने मागितले होते. इतकी रक्कम देणे शक्य नसेल तर लग्न करणार नाही, अशी धमकी डॉ. आशिषने दिल्याचाही आरोप तक्रारदार तरुणीने केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी फसवणूक, विश्वासघात, बदनामी करणे तसेच हुंडाप्रतिबंधक कायद्याचे कलम 3, 4 अन्वये डॉ. आशिषविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी सांगितले.

Trending