आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- जिल्ह्यासह शहरातील महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या छात्र संघ निवडणुकीत अभाविप व भारतीय जनता युवा मोर्चाने वर्चस्व स्थापन केले. अभाविपने १३ महाविद्यालयांत, भाजयुमोने ५, युवक काँग्रेसने ३, तर युवा सेनेने एक जागा जिंकल्याचा दावा केला.
शहरातील शासकीय अभियांत्रिकीत अभिजित देशमुख, सिपना अभियांत्रिकी प्रणव अलोनी, पाटील अभियांत्रिकी श्रेयस रहाटे, पोटे वास्तुशास्त्र महाविद्यालय पुष्कर तोष्णीवाल, हव्याप्रम शारीरिक शिक्षण महाविद्यालय अनिकेत आंबेकर, भारतीय महाविद्यालय नरेंद्र वारे, केशरबाई लाहोटी नमिता साहू, नरसम्मा महाविद्यालय अंकित रहाटे यासह राम मेघे (ओल्ड), राम मेघे (न्यू), राम मेघे फार्मसी व आयबीएसएस या ठिकाणी विद्यार्थी संघ निवडणुकीत अभाविपचे उमेदवार निवडून आल्याचा दावा अभाविपचे प्रांताध्यक्ष स्वप्निल पोतदार यांनी केला. याचवेळी शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत मयूर राऊत, शासकीय औषध निर्माण महाविद्यालय अक्षय खाडे, शिवाजी कला व वाणिज्य सत्यम किरक्टे, डॉ. देशमुख विधी महाविद्यालय आदिब्रम्ह गावंडे आणि हव्याप्रमं शारीरिक शिक्षण महाविद्यालय अनिकेत आंबेकर या ठिकाणी भाजयुमोचे उमेदवार निवडून आले. युवक काँग्रेसने विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय ज्ञानेश्वर गिरी, दंत महाविद्यालय प्रतीक इंगळे, पंजाबराव नर्सिंग महाविद्यालय आकाश जयसिंगपुरे यांनी युवक काँग्रेसकडून विजय मिळवला. महात्मा फुले कला वाणिज्यत धीरज आठवले विजयी झाल्याचे युवा सेनेचे शहर प्रमुख प्रवीण दिधते यांनी सांगितले.
परतवाडा; परतवाड्यात एनएसयूआय, रायुकाँ, अभाविपचा झेंडा
अचलपूर तालुक्यातील तीन महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीत भगवंतराव पाटील महाविद्यालय व स्व. छ. मु. कढी कला कॉलेज एनएसयूआय व राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तर 'जगदंबा'वर अभाविपने झेंडा फडकवला आहे. भ. शि. पाटील महाविद्यालयातील एनएसयुआय व रायुकाँची उमेदवार प्रगती बोरेकर, तर शिवसेनेचे हर्षाली वांगे यांना प्रत्येकी दहा मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढली. त्या आधारे प्रगती बोरेकर विजयी झाली. कढी कला महाविद्यालयात एनएसयूआय व रायुकाँच्या पायल डांगेने विजय मिळवला.
दर्यापूर; दर्यापूरमध्ये भाजयुमोने फडवली विजयी पताका
जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय व कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. महिला महाविद्यलयाच्या निवडणूक रिंगणामध्ये चार विद्यार्थिनी होत्या. एकूण १४ पैकी १२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये हर्षा श्रावणेने विजय मिळवला. प्राचार्य अविनाश चौखंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सांगळूदकर महाविद्यालयात भाजयुमो व भाजप आघाडीच्या सुमित अंबुसकरने ९ मते घेत अक्षय गवईला मात दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राचार्य छात्र संघ निवडणुकीत अभाविप व भाजयूमोचे वर्चस्व रामेशवर भिसे यांच्या मार्गदर्शनात प्रा. विजय निशाने, प्रा. डाॅ. अरुण चांदुरकर, डाॅ. प्रफुल्लता कोलखेडे, डाॅ. नरेंद्र माने, पंडित बारदे यांनी काम पाहिले. दोन्ही विजयी उमेदवारांसाठी भाजयुमो तालुकाध्यक्ष विनय गावंडे, रोशन कट्यारमल, अनिकेत शेगोकार, आकाश नारोळकर, विकी खारोडे, पवन वाकोडे, गणेश साबळे, अक्षय व्हिल्हेकर आदींचे सहकार्य लाभले.
मोर्शीत दर्शन ठवडी, पूजा राऊत विजयी : मोर्शी
छात्रसंघाच्या निवडणुकीत येथील आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयात अभाविपच्या दर्शन ठवडी याने बहुमत घेत विजय मिळवला. निवडणूक प्रक्रिया प्राचार्य जी. आर. तडस यांच्या मार्गदर्शनात झाली. शहरातील भारतीय महाविद्यालयात विद्यार्थी सेना-काँग्रेस युतीची उमेदवार पूजा राऊतने प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश राऊत याला ८, तर अभाविपचा पीयूष खोडे यांना दोन मतांवर समाधान देत दहा मतांनी विजय मिळवला. निवडणूक प्रक्रिया प्राचार्य जी. एस. मेश्राम यांचे मार्गदर्शनात झाली. येवदा येथे आदित्य भराटेने मारली बाजी : येवदा | येथील कला वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या निवडणुकीत आदित्य भराटेने ६ मते मिळवून विजय मिळवला या. निवडणुकीत एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. यामध्येच एनएसयूआयच्या अंकिता कात्रे व बहुजन विद्यार्थी आघाडीची शालिनी मुरकुटे यांचा समावेश होता. यामध्ये १० पैकी ६ मते मिळवत आदित्यने बाजी मारली. निवडणूक प्राचार्य डॉ. वाय. सिंग व प्रा. व्ही. राठोड यांच्या उपस्थितीत पार पडली. मार्गदर्शक म्हणून आशिष कोकाटे, सागर वांदे यांचे सहकार्य लाभले. सूरज कैकाडी, शुभम रघुवंशी, ऋषिकेश गावंडे, विवेक इंगळे, पंकज कान्हेरकर, शंतनू मोहोड, सोपान वडतकर, आकाश देव्हारे, अनिरुद्ध गावंडे, पवन शित्रे, राहुल नागदिवे, किशोर कंकाळे, कुलदीप भालतडकने परिश्रम घेतले.
धामणगाव रेल्वे; धामणगाव येथे अभाविप, जनता युवा मोर्चाचा दणदणीत विजय
शहरातील महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जनता युवा मोर्चा समर्थित मोहन गोपाळ याने दणदणीत विजय मिळवला. आदर्श महाविद्यालयातील निवडणुकीत काँग्रेस समर्थित एनएसयूआयची उमेदवार मेघा भोगे निवडणूक रिंगणात होती. दुसरीकडे भाजयूमोचे प्रदेश उपाध्यक्ष व नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात अभाविपचा मोहन याची उमेदवारी निश्चित झाली होती. एकूण २६ विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. मेघाला २० मतांनी मात देत मोहन गोपाळ याने विजय मिळवला. सारडा महाविद्यालयाची प्रतीक्षा राऊत बिनविरोध : अंजनगाव सुर्जी | येथील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील छात्रसंघाच्या निवडणुकीत प्रतीक्षा राऊत हिचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ती बिनविरोध निवडून आली. प्रभारी प्राचार्य डॉ. विना राठी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी छात्र संघातील प्रतिनिधी उपस्थिती होते. निवडणुकीसाठी विद्यार्थी परिषदेचे समन्वयक प्रा. एस. किन्हीकर, प्रा. के. हिरुळकर, प्रा. सी. वडाळे, प्रा. समिर बिजवे, प्रा. नितीन वानखडे यांचे सहकार्य लाभले. टोम्पे महाविद्यालयात राजेंद्र कारिया याची निवड : शिरजगाव कसबा | चांदूर बाजार येथील गो. सी. टोम्पे महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या छात्र संघाच्या निवडणुकीत येथील राजेंद्र कारिया याने बाजी मारली. निवडणुकीतील त्याच्या निवडीचा महाविद्यालयात आनंद साजरा करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.