आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- विकास कामांचे ९०.५० कोटी रुपयांची देयके थकल्याने बांधकाम कंत्राटदारांनी महापालिकेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. कंत्राटदारांकडून देण्यात येणाऱ्या घोषणेमुळे मनपाची आम सभा सुरू असलेले सभागृह देखील दणाणले होते. दरम्यान, आयुक्तांकडून फौजदारीचे आदेश दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत कंत्राटदारांचे आंदोलन सुरूच होते.
महापालिकेच्या नोंदणीकृत कंत्राटदारांची शहरात केलेल्या विकास कामांची डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत ९० कोटी ५० लाख रुपयांची देयके प्रलंबित आहे. प्रलंबित देयकांबाबत वेळोवेळी निवेदने दिली, पाठपुरावा केला. तरी मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदारांकडून लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. चाैदावा वित्त आयोग, मूलभूत सोयी सुविधा, रस्ते नझूल उत्पन्न (रिलायन्स, एअरटेल, एमएसईबी), विकास शुल्काची थकीत असलेली देयके पूर्णत: अदा करावी. मनपा निधीतून केलेल्या कामांच्या देयकांची किमान ७५ टक्के रक्कम द्यावी. जीएसटी अंतर्गत देयकाचे प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला सादर करावे लागते. त्याकरिता जीएसटी भरल्या बाबतचे विवरणपत्र दर महिन्याच्या १० तारखेला देऊन जीएसटीची रक्कम देण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निकाली काढण्याचे महापौरांचे आश्वासन
प्रलंबित देयकांचे प्रकरण येत्या काही दिवसांत निकाली काढण्याचे आश्वासन महापौर संजय नरवणे यांच्याकडून कंत्राटदारांना सायंकाळच्या सुमारास देण्यात आले. या वेळी उपमहापौर संध्या टिकले, पक्षनेता सुनील काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.