आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगडीच्या रकमेसाठी घेतला दोघांचा बळी, दुहेरी खून प्रकरणातील मारेकरी अर्जुने कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महामार्गावरीलधाबा चालवण्यासाठी ठरलेली पगडीची रक्कम ट्रकमधील सोयाबीन विकून देण्यासाठीच दुहेरी खून प्रकरणातील मारेकरी प्रशांत अर्जुने याने ट्रकचालक क्लीनरचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
प्रशांत अर्जुने याने महामार्गावरील धाबा चालवण्यासाठी घेतला आहे. याच धाब्याच्या मालकाला प्रशांतला पगडीची रक्कम द्यायची होती.
ही पगडीची रक्कम भरण्यासाठी त्याच्याकडे रक्कम नव्हती. त्यामुळे त्याने सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकासह क्लीनरला जीवाने मारून त्यांच्या ट्रकमधील सोयाबीन लुटले होते. याच सोयाबीनच्या रकमेतून आपण पगडीची लाख १८ हजार रुपये रक्कम देऊ, याच इराध्याने त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथील रहिवासी ट्रकचालक फिरोज खान अनिस खान (३५) आणि सलीम अहमद (२२) या दोन जीवांचा बळी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. हे दोघे बुधवारी हिंगणघाटवरून रिसोडला सोयाबीन घेऊन जात होते.
या वेळी त्यांच्या ट्रकमध्ये २१० पोते सोयाबीन होते. सायंकाळी वाजताच्या सुमारास फिरोज यांच्या ट्रकचे टायर तळेगावच्या अलीकडेच पंक्चर झाले होते. त्यामुळे त्यांनी सोबत असलेली स्टेपनी वापरून पुढील प्रवास सुरू केला. मात्र, अवघ्या दोन ते तीन किलोमीटर चालल्यानंतर त्या ट्रकचे टायर फुटले. त्यामुळे त्यांना आता थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्यांनी ट्रक उभा केला जॅकच्या मदतीने टायर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर जॅक खराब होते. त्यामुळे फिरोज सलीम बाजूलाच असलेल्या रुद्राक्ष धाब्यावर गेलेत. हा धाबा मागील दीड महिन्यांपूर्वी दत्तापूर येथील प्रशांत अर्जुने याने चालवण्यासाठी घेतला. आमच्याकडे जॅक नाही, मात्र प्रशांतने या वेळी स्वत:ची दुचाकी त्यांना दिली पुलगाववरून जॅक घेऊन येण्यास सांगितले. काही दूर गेल्यानंतर प्रशांतच्या दुचाकीचेसुद्धा ट्यूब फुटले, त्यामुळे या दोघांना पुढील प्रवास आता शक्यच नव्हते.

लवकरच करणार सोयाबीन जप्त
^आम्हीतीन मोरकऱ्यांना पकडले असून चवथ्याच्या शोधात आहे. ट्रकमधून काढलेले जवळपास ९५ पोते सोयाबीन जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. लवकरच ते सोयाबीन जप्त करण्यात येणार आहे. पैशासाठीच हे दुहेरी खून प्रकरण घडल्याचे प्राथमिक तपासावरून पुढे येत आहे. किरणवानखडे, सहायक पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.
असे पोहोचले पोलिस मारेकऱ्यांपर्यंत : पोलिसघटनास्थळी पोहोचले त्या वेळी मृतकांची ओळखसुद्धा पटली नव्हती. पोलिसांनी ट्रकमधील जॅक पाहिले, त्या वेळी एक जॅक लोकल असल्याचे लक्षात आले. त्यावरून परिसरातील सर्व धाबे पिंजून हा जॅक ज्या पंक्चरच्या दुकानातून आणला होता त्याला गाठले. त्याच्याकडून माहिती घेतली असता दोन व्यक्ती एका डिस्कव्हरवर आले होते. त्याआधारे पोलिसांनी प्रशांत अर्जुनेपर्यंत पोहोचले त्याच्यासह अन्य दोघांना अटक केली.

"ब्रेव्हो' एलसीबी : ग्रामीणपोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत या क्लिष्ट प्रकरणात मारेकऱ्यांना पकडून प्रकरणाचा छडा लावला. यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेने ज्या पद्धतीने प्रकरणांचा छडा लावला आहे, ते पाहून पोलिस दलातच एलसीबीची कामगिरी जबरदस्त सुरू असल्याची चर्चा सध्या ग्रामीणसह शहर पोलिस दलातही आहे.