आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी अपघातात एक ठार, दोन गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विरुद्धदिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एका दुचाकीच्या चालकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी वाजताच्या सुमारास डिगरगव्हाण ते पिंपळविहीर मार्गावर झाला आहे. अपघातातील जखमींवर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रदीप पंजाबराव नागपुरे (३२, रा. पातूर(अडगाव) असे मृतकाचे नाव आहे. याच वेळी योगेश जानरावजी भोगे (२८, रा. पातूर (अडगाव) आणि उमेश रामरावजी मामुद्रे (२७, रा. तळेगाव ठाकूर) हे दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी २० नाेव्हेंबरच्या दुपारच्या सुमारास प्रदीप त्यांचे मित्र योगेश हे दोघे दुचाकीने पातूरवरून शेंदोळा धस्कट या गावी जात होते. शेंदोळा येथे प्रदीप यांचे नातेवाईक राहतात. प्रदीप हे माहुली ते पिंपळविहीरमार्गे शेंदोळ्याला जाण्यासाठी निघाले. याच मार्गातील डिगरगव्हाण ते पिंपळविहीर मार्गादरम्यान विरुद्ध दिशेने उमेश मामुद्रे दुचाकीने आले. या दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. त्या वेळी प्रदीप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या तिघांनाही उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रदीप यांची प्राणज्योत मालवली, तर योगेश उमेश यांच्यावर उपचार सुरू आहेत.