आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव मिनीट्रकने बालिकेला चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव कसबा - रस्ता ओलांडणाऱ्या एका पाच वर्षीय बालिकेला भरधाव मिनी ट्रकने चिरडल्याची घटना बुधवारी (दि. २५) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास येथे घडली.शिवाणी सुनील वाडीवा असे जागीच मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. घटनेच्या वेळी शिवाणी रस्ता ओलांडत होती. त्याच वेळी परतवाडा रोडवर करजगावकडून संत्री भरण्याचे खाली कॅरेट घेऊन येत असलेला मिनी ट्रक (जीजे ५/ एव्ही- ३६०९) अनियंत्रित झाल्याने शिवाणी मिनी ट्रकखाली आली. त्यात ती जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालक नानखाऊ खाँ बाबाउद्दीन (३२) याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. पुढील तपास ठाणेदार विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार केशव सुने करत आहे.
निष्पापचिमुकलीसाठी पालकांचा हंबरडा
शिवाणीचामृतदेह घरी येताच तिच्या पालकांनी हंबरडा फोडला. घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिवाणीला सहा महिन्यांची एक बहीण आहे.

ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आजच्या घटनेमुळे लहान मुले असलेल्या पालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. कमी वेळेत लवकर पोहोचण्यासाठी वाहन चालक अतिवेगाने वाहने चालवून शिवाणीसारख्या निष्पांप जीवांचा बळी घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.