आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्झरीच्या धडकेत एक ठार, १८ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी - दुचाकीला भरधाव लक्झरी बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला १५ वर्षीय मुलगा ठार तर १८ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १८) सकाळी अकरा वाजता तालुक्यातील भंडारज ते कारला मार्गावर घडली. पवन प्रभुदास चोपकार (१५) असे मृतकाचे नाव आहे. अकोला येथील लक्झरी (एमएच३०/ एए६३७०) परतवाडा येथून अकोल्याकडे जात होती. तर भंडारज- कारला दरम्यान राजेश मारोती पातुर्डे (२३) पवन प्रभुदास चोपकार (१५) होंडा स्प्लेंडर (एमएच३०/एएफ ५९२७)ने प्रवास करीत होते. दरम्यान भरधाव लक्झरीने या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेला पवन हा जागीच ठार झाला, तर राजेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर चालकाचे िनयंत्रण बिघडल्याने बस झाडाला धडकली.ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यात खासगी प्रवाशी गाडीतील प्रमोद पवार (५०), कुंदा प्रमोद पवार (३५), आदेश प्रमाेद पवार (१६), मनोरमा कळस्कर (५०) रा. वडगाव फत्तेपूर, किसन कळस्कर (५२), शंकर खरडे (६०) रा. पुसदा, बाबुलाल तुळशीराम सुने (४०) रा. अंजनगाव सुर्जी, सादिका बी (६०) रा. वाडेगाव, जि. अकोला हे गंभीर जखमी झाले. अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींना त्वरित येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. किरकोळ जखमी मिळेल त्या वाहनाने खासगी दवाखान्यात उपचारासाठी निघून गेले. जखमींच्या मदतीसाठी प्रदीप निमकाळे, सागर हुरबडे, प्रशांत मसाने, सागर मसाने, बेदरकर, चोपकार आदी ग्रामस्थ धाऊन आले. पुढील तपास सुरू आहे.
अवैध प्रवासी वाहतूक थांबवा हाअपघात अवैध प्रवासी वाहतुकीतून घडला आहे.परमिटच्या नावाखाली होणाऱ्या अवैध वाहतुकीवर त्वरित आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी नवनियुक्त ठाणेदार संजय लोहकर यांच्याकडे केली आहे.