आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार,जमावाने पेटवला ट्रक, घटनेनंतर चालक फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे- बाजारातून ताडपत्री खरेदी करून घरी परतणाऱ्या पिता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोरगाव निस्ताने गावाजवळ घडली. हरिश्चंद्र सीताराम कांबळे (६५) राहुल हरिश्चंद्र कांबळे (३५, दोघेही रा. बोरगाव निस्ताने ) अशी मृतकांची नावे आहेत. एकाच वेळी पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कांबळे पिता-पुत्र दुचाकीने (एमएच २७/ जी ४१२२) मंगरुळ दस्तगीर येथे ताडपत्री खरेदीसाठी गेले होते. दरम्यान, ते गावाकडे येत असताना वाळू घेऊन मंगरुळ दस्तगीरकडे जाणाऱ्या ट्रकने (एमडब्ल्यूवाय ६४९०) दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटना घडताच ट्रकचालक पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पीएसआय साहेबराव ठावरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवाले. वृत्त लिहिस्तोवर ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल व्हायचा होता. एकाच कुटुंबातील पिता-पुत्रावर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संतप्तजमावाने पेटवला ट्रक : गावाजवळूनअवघ्या हाकेच्या अंतरावर घटना घडल्याने ती गावात पसरली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी ट्रकची तोडफोड करून तो पेटवून दिला. त्यामुळे परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर : मृतकहरिश्चंद्र कांबळे यांना पत्नी शोभा, चार मुली राहुल हा एकुलता एक मुलगा होता. राहुलचे लग्न झाले असून, त्याला दोन मुले आहेत. पित्यासह कुटुंबातील कर्ता राहुलच्या निधनामुळे कांबळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.