आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस, गडकरी, मुंडे आज शहरामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जानेवारी रोजी अमरावतीत येत अाहेत. हे दोन्ही मंत्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजित ४५ व्या आयएसटीई अॅन्युअल नॅशनल कन्व्हेंशन अँड इंटरनॅशनल कॉन्फरन्सला उपस्थित राहतील. सायंकाळी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडेही अमरावतीत दाखल होत आहेत.
फडणवीस यांचे सकाळी वाजून पाच मिनिटांनी बेलोरा विमानतळ येथे आगमन होईल. तेथून मोटारीने ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडे प्रयाण करतील. उद््घाटन आटोपल्यानंतर सकाळी १०.३५ वाजता ते विमानतळाकडे प्रयाण करून सकाळी ११ वाजता जळगावकडे प्रयाण करतील. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सकाळी १० वाजता नागपूर येथून विशेष विमानाने अमरावतीसाठी निघतील. सकाळी ११ च्या सुमारास हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परिषदस्थळी पोहोचून दुपारी एकपर्यंत उपस्थित राहतील. दीड वाजता बेलोरा विमानतळाहून नागपूरकडे प्रयाण करतील.

पंकजामुंडे मुक्कामी
राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता जळगाव येथून शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. दुसऱ्या दिवशी १० जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता त्या सायन्सस्कोर मैदानातील महिला मेळावा आणि बचत गटाच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करतील. दुपारी साडेचार वाजता त्या चांदूरबाजारनजीकच्या बेलोरा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदीजोड प्रकल्पाचे जलपूजन करतील. रात्री सोयीनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.