आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतावर ‘सहकार’चे वर्चस्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- अचलपूरकृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची राहिली असूून, क्रॉस व्होटिंगमुळे मोठा बदल दिसून अाला. अजय पाटील आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात समता पॅनलचे सहा, तर बबलू देशमुख, विजय काळे, राजाभाऊ टवलारकर, प्रकाश वैद्य यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलचे आठ उमेदवार विजयी ठरले. या अटीतटीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तीन मतदारसंघात फेर मतमोजणी करावी लागली.
राजाभाऊ टवलारकर दीपाली अपाले यांना प्रत्येकी २८०, अशी मत पडल्याने फेर मतमोजणी करण्यात आली. यात टवलारकर यांची मतसंख्या तीनने वाढून २८३ झाली. सेवा सहकारी मतदारसंघातून सहकार पॅनलचे विजय काळे, बाबुराव गावंडे, अमोल चिमोटे, तर समता पॅनलचे अजय पाटील, गजानन भोरे, गोपाल लहाने विजयी ठरले. सर्वसाधारण महिला मतदारसंघातून समता पॅनलच्या किरण शेळके, तर सहकारच्या वर्षा पवित्रकार, सोसायटी ओबीसी प्रवर्गातून सहकारी पॅनलचे गंगाधर चौधरी चौथ्यांदा विजयी ठरले. समता पॅनलचे शिवाजी चित्रकार पराजित झालेत. सोसायटी विमुक्त जाती प्रवर्गातून समताचे गंगाराम काळे विजयी, तर साधुराम येवले यांना पराजयाची

अनिर्णीत निकालाकडे लक्ष :
अडत्यामापारी मतदारसंघाचा निकाल अनिर्णीत ठेवल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघातून कुलदीप काळपांंडे यांची पूर्वीच अविरोध निवड झाली आहे.

अवैध क्राॅसिंग मते ठरली निर्णायक :
यानिवडणुकीत मोठ्या प्रमाणात अवैध मतदान झाल्याने निकालाचे समीकरण बदलले. ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वाधिक ८० मते अवैध होती, तर ग्रामपंचायत मतदारसंघातील ४२ मते अवैध ठरली, तर सेवा सहकारी सोसायटीच्या िवमुक्त प्रवर्गात ३६, महिला राखीव २८ मते अवैध ठरली. हमाल मापारी संघात सर्वाधिक कमी मते अवैध ठरली. तसेच क्रॉस मतदान झाल्याने समीकरण बदलली.