आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ‘हॉकर्स’ला लवकरच अच्छे दिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीकरांना वर्षानुवर्षांपासून दारावर सेवा देणाऱ्या ‘हॉकर्स’ला (फेरीवाले) लवकरच अच्छे दिन येणार आहेत. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या नेतृत्वात महापालिकेने तशी तयारी सुरू केली असून, १० जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या निविदा सोमवार, १३ जुलैला उघडल्या जाणार आहेत. या निविदांद्वारे हॉकर्सच्या मोजदादीचा मुद्दाही निकाली निघेल.

हॉकर्सला हक्काची जागा नसल्यामुळे सध्या शहरातील बहुतेक रस्त्यांवर दाटीवाटीने त्यांच्या गाड्या उभ्या असतात. यामुळे अमरावतीकरांना रस्त्यावरच खरेदीचा आनंद तर मिळतो. मात्र, काही प्रसंगी फेरीवाल्यांच्या रस्त्यावरील उपस्थितीमुळे वाहतूक विस्कळीत होऊन अपघातांचाही सामना करावा लागतो. ‘दिव्य मराठी’ हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून मनपाच्या लक्षात आणून दिला, हे विशेष.

दरम्यान ‘आयटक’च्या नेतृत्वातील महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन इतर संघटनांनीही या मुद्द्याला धरून मनपा प्रशासनाच्या भेटी घेतल्या. शहरात हॉकर्स झोनची निर्मिती पोलिस आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या नाहक कारवाईला लगाम, अशी मागणी त्यांच्यातर्फे करण्यात आली होती. हॉकर्स झोनची निर्मिती रखडल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे फेडरेशनने आयुक्तांच्या लक्षात आणून िदले होते.

संख्या कळणार आज फेडरेशनने मागितल्या ‘बीपीएल’च्या सवलती
हॉकर्सचीमिळकत अत्यंत माफक असल्यामुळे त्यांना बीपीएलच्या सवलती द्या, अशी मागणी महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष सुनील घटाळे यांनी केली आहे. कोलकाता शहरातील फेरीवाल्यांना अशी सवलत मिळाली असून, दिल्लीनंतर महाराष्ट्रात पुण्यातही फेरीवाल्यांची शास्रोक्त नोंदणी झाली आहे.

रॅण्डम चित्रीकरणास प्रारंभ,पडताळणी होणार
शहरातिकती फेरीवाले आहेत, त्यांचे व्यवसाय काय आहेत, कोणत्या वेळी ते कोठे उभे राहतात, कशा-कशाची विक्री करतात, आदी माहिती गोळा करण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरभर व्हिडिओ छायाचित्रण केले जात असून, नोंदणी केल्यानंतर त्यांची संख्या सदर छायाचित्रणाशी पडताळून पाहिली जाणार आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करा
राष्ट्रीयफेरीवाला धोरणानुसार हॉकर्सचे हक्क जपणे बंधनकारक असतानाही अमरावतीत या धोरणाची सरळसरळ पायमल्ली केली जाते. पोलिसांकरवी वारंवार त्यांचे साहित्य जप्त केले जाते. नाशवंत साहित्य त्याच दिवशी आणि इतर साहित्य तीन दिवसांत परत मागण्याचा हॉकर्सचा हक्कही डावलला जातो. हे सर्व मुद्दे फेडरेशनने आयुक्तांसमोर अधोरेखित केले होते.

वर्दळीच्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या हॉकर्सना लवकरच मिळणार स्वतंत्र जागा
हॉकर्स झोनच्या निर्मितीनंतर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दिसणारी ही गर्दी निश्चितच कमी होणार आहे.
छाया:मनीष जगताप.
फेरीवाल्यांचा प्रश्न बिकट होत चालला आहे. तो सोडवण्यासाठी मनपाने प्रयत्न सुरू केले आहेत. नोंदणीसाठीच्या निविदा बोलावणे, हा त्याचाच एक भाग आहे. नेमक्या किती निविदा प्राप्त झाल्या, हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. विनायकऔगड,उपायुक्त,मनपा,अमरावती.

पुढे काय होणार?
फेडरेशनच्यासर्व बाबी एेकून घेतल्यानंतर त्यावर लवकरच तोडगा शोधून काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. त्यांच्यामते हॉकर्स झोनची स्थापना, त्यातील व्यवसायाचे वेळापत्रक, हॉकर्सची नोंदणी, स्मार्ट कार्डचा पुरवठा, त्यांची बायोमेट्रिक नोंद आदी बाबी टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील.