आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि‍ल्‍ह्यातील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेत सोनेरी कामग‍िरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण चार पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंसह प्रशिक्षक वर्ग. - Divya Marathi
राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण चार पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंसह प्रशिक्षक वर्ग.
अमरावती - राज्यस्तरीय क‍िक बाॅक्सिंग स्पर्धेत अमरावती ज‍िल्ह्यातील खेळाडूंनी दणकेबाज कामगिरी करून एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकासह चार पदकांची कमाई करून वर्चस्व स्थापित केले. या खेळाल अल्पावधीतच अमरावतीकर खेळाडूंनी कौशल्य म‍िळवून दमदार वाटचाल सुरू केली आहे. आता शालेय क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून तो ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नुकतीच बुलडाणा ज‍िल्ह्यातील चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धेत अमरावतीकर खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले. नवीन क्रीडा प्रकार असला तरी ज‍िल्ह्यातील सहभागी बाॅक्सर्सने कमी वेळात कौशल्य संपादन करून आपल्या उत्तम कामगिरीची छाप टाकली. कुणाल ज‍िचकारने प्रतिस्पर्धी खेळाडूला अंत‍िम लढतीत नामोहरम करून सुवर्णपदकाची कमाई केली. यश इंगोले आणि शुभम गुहे यांनीही प्रयत्नांची श‍िकस्त केली मात्र त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आशिष बंगने कांस्यपदकावर ताबा म‍िळवला.
ज‍िल्हा किक बाॅक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डाॅ. गावंडे, सचिव प्रतीक डुकरे आणि ज‍िल्हा शारीरिक शिक्षण समितीचे सचिव नितीन चवाळे यांनी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश
शालेय क्रीडा स्पर्धेत किक बाॅक्सिंग या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंनी िमळवलेल्या यशाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व तालुक्यात खेळाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध
राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पुणे येथील राष्ट्रीय क‍िक बाॅक्सिंग स्पर्धेसाठी न‍िवड झाली आहे. या स्पर्धेत अमरावती येथून एकूण सहा खेळाडू सहभागी होणार आहेत.