वरूड; माहीतीतंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कॅझीमेत्रा या संस्थेमार्फत मेक इन इंडिया एक्सलंट पुरस्काराने कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला पुरस्कृत करण्यात आले. केंद्रीय लघु उद्योग मंत्री कलराज मिश्रा भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले, डॉ. के. पद्मानाभन, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते रमेश जिचकार, राजेश काळे, राहुल गुळधे यांना गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा गांधी मंदिर येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
सर रतन टाटा ट्रस्ट आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी अंतर्गत कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्प तालुक्यातील १५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत. या माध्यमातून शेतीपूरक अनेक उपक्रम राबवल्या जातात. या पुरस्काराच्या यशस्वीतेसाठी गणपती गेडाम, रमेश भोंडे, प्रफुल सांभारतोडे, स्वप्नील वैद्य, दिपांजली चोबीतकर, उषा कराळे, किशोरी कोहळे, शिल्पा घोडसे यांनी परिश्रम घेतले.