आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी महिलांची धडक, गावामध्ये पोलिस चौकी लावण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - दारूमुळेअनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. परिणामी, शहरासह जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, यासाठी ववििध संघटना सरसावल्या आहेत. महिलांच्या पुढाकाराने अनेक गावांतील अवैध दारू विक्री बंद झाली आहे. यासाठी गावात पोलिस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. या मागणीसाठी आज, ऑगस्ट रोजी लगतच्या तळेगाव, भारी पिंपळगाव येथील दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या शेकडो महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना नविेदन दिले.

चंद्रपूरप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातही दारूबंदी व्हावी, म्हणून सद्य:स्थितीत विविध संघटना कार्यरत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. अवैध दारू गावागावांत विक्री केल्या जात असल्यामुळे मोठ्यांसह लहान मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहेत. प्रत्येक गावात दारूबंदी व्हावी, यासाठी अनेक महिलांनी पुढाकार घेतला. मात्र, तरीही गावात अवैध दारू येत असल्याने तळेगाव, पिंपळगाव भारी येथील महिलांनी आज, ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या वेळी महिलांनी दारूबंदी करावी, अशी मागणी नविेदनातून केली. त्याचप्रमाणे गावात पोलिस चौकी उभारून दारू विक्रीवर कायमस्वरूपी आळा बसवावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना नविेदन दिले. या वेळी दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समितीचे उमेश मेश्राम, संगीता पवार, मनोज केळकर, राम मरकाम, नंदू मंदाडे, गोपाबाई राठोड, लता ठाकरे, प्रमिला शाहारे, माया मानकर, सुशीला हटवारे, रुक्माबाई नाईक यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...