आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, दोन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लॉक करून ठेवलेल्या दुचाकी लंपास केल्या. पहिली घटना ही राजापेठ, तर दुसरी अशीच घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली.
राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दस्तूरनगर गल्ली नंबर दोनमधील रहिवासी राजेश जगदीश बुलाणी (४८) यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजेश यांनी आपली दुचाकी क्रमांक (एमएच २७ बीए ८९४७) घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने गाडीचे लॉक तोडून ही गाडी लंपास केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ४० हजार रुपये या गाडीची किंमत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
दुसरी घटना ही गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. राठीनगर येथील शिक्षणासाठी रूम करून राहत असलेल्या विद्यार्थ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी जयेश यादवराव मेहरे (१८, राठीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जयेश हा अमरावतीत शिक्षणासाठी आला आहे.कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर त्याला आपली दुचाकी क्रमांक (एमएच २७ एस ६५३५) चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. गाडीची किंमत १५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.