आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशनापूर्वी राजापेठ स्थानकावरून धावतील गाड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, दररोज पंधराशे फेऱ्यांचे आवागमन आणि दहा हजारांवर प्रवाशांची वर्दळ असे चित्र अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे आहे. तर, दुसरीकडे राजापेठ स्थानक पूर्णपणे तयार असूनही केवळ लोकप्रतिनिधींची तारीख मिळत नसल्याने उद्घाटनाचा मुहूर्त दिवसेंदिवस लांबणीवर जात आहे. स्थानकाचे काम पूर्ण होऊनही उद्घाटन तारखेसंदर्भात प्रशासन अनभिज्ञ आहे. यासंदर्भात ते चालढकल करत असून, प्रतिक्रिया घेतली असता आता होईल, मग होईल असे सांगून अधिकारी हात झटकत आहेत. तर, दुसरीकडे स्थानक सुरू झाले नाही, तर स्वत:च स्थानक सुरू करण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
दरम्यान, नियमित आगार व्यवस्थापकाअभावी मागील आठ महिन्यांपासून मुख्य स्थानकाचे कामकाज सुरू आहे. मुख्य डेपोवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था असतानादेखील प्रवाशांना वेठीस धरण्यात येत अाहे. हे स्थानक सुरू झाले तर मुख्य स्थानकावरील ४० टक्के ताण कमी होणार आहे. परंतु, दुसरीकडे स्थानक पूर्ण असूनही ते सुरू करण्यास प्रशासनाकडून चालढकल होत आहे. खरं तर पुणेसाठी नवीन बसस्थानकावरूनच गाड्या सोडण्यात येईल, असे संकेत होते. परंतु, दीपावलीचे नियोजनही मध्यवर्ती बसस्थानकावरूनच करण्यात आले. आगार व्यवस्थापकाचे रिक्त पद, बसस्थानकप्रमुखावर एकापेक्षा अधिक जबाबदाऱ्या याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून उद््घाटन कार्यक्रमाचा मुहूर्त लांबणीवर नेण्यात येत आहे. स्थानक तत्काळ सुरू करून प्रवाशांची होणारी असुविधा दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. भांडण कोणाचेही असो प्रशासनाने प्रवाशांना वेठीस धरू नये, अशी खंतही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
अधिवेशनापूर्वी होईल स्थानकाचे लोकार्पण
^बस स्थानकाच्या उद्घाटनासाठी आतापर्यंत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पंधराहून अधिकदा पत्रव्यवहार केला. या महिन्याच्या शेवटपर्यंत उद्घाटन झाले नाही, तर २० डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून उद्घाटन केले जाईल.

^दिव्य मराठी ने राजापेठ स्थानकासंदर्भात वारंवार पाठपुरावा करीत आहे.सर्व सोयी असताना या स्थानकावरून का बरं गाड्या सोडण्यात येत नाही, हेच कळायला मार्ग नाही. प्रशासनाने उद्घाटनाची प्रतीक्षा करता स्थानक सुरू करावे नंतर स्थानकाचे उद्घाटन करावे.लवकरच उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. सुभाष देशमुख, अपडाऊन प्रवासी.

^कल्याण-डोंबिवली मनपाची निवडणूक असल्याने भाजप शिवसेनेचे नेते व्यस्त होते. सध्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशना पूर्वी हे स्थानक नक्कीच सुरू होईल.