आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात २६ ‘डेंजर स्पॉट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती शहरातील धोकादायक ठिकाण - Divya Marathi
अमरावती शहरातील धोकादायक ठिकाण
अमरावती- जीर्ण धोकादायक इमारतीच्या रुपाने अमरावतीत २६ ठिकाणी ‘डेंजर स्पॉट’ उभे ठाकले आहेत. मनपाने या सर्व इमारतधारकांना नोटीस जारी केल्या असून त्या स्वत:हून पाडून घ्याव्यात, असा सल्ला-वजा-आदेश दिला आहे. तसे केल्यास त्या इमारती प्रशासनातर्फे जमीनदोस्त केल्या जातील, अशा इशाराही देण्यात आला आहे.
या इमारतींमध्ये सामाजिक सेवाभावी काम करणाऱ्या पाच संस्थांच्या वास्तूंचाही समावेश असून त्या पाडल्यास जीवित वित्त हानी होऊ शकते, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. यािशवाय २१ इमारती ह्या सामान्य नागरिकांची निवासस्थाने असून त्या धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे या अहवालात नमूद आहे. परिणामी या सर्व इमारती पाडल्या जाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.

अंबादेवी रस्त्यावरील डॉ. जोशी पब्लिक ट्रस्ट, बुधवाऱ्यातील पंचशील मंडळाचे कार्यालय, अंबागेट जवळील रामचंद्र दीक्षित चॅरिटेबल ट्रस्टची इमारत, जवाहरगेटचे चेतनदास बालाजी संस्थान कुंभारवाड्याचे गजानन महाराज संस्थान या पाचही इमारतीच्या विश्वस्तांना मनपाच्या बांधकाम विभागाने नोटीस जारी करुन त्या पाडण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय बडनेराचे किशोर खरय्या सुरेश वंजारी, अंबापेठ स्थित मुक्ताबेन लोहिया, सबनीस प्लॉटचे दिलीपसिंह रघुवंशी, कॅम्प स्थित विमला सिकची, भाजीबाजारातील रेडे, सुधीर भिवापुरकर, मुकुंद जोगळेकर सुधीर आकोलकर, सक्करसाथ स्थित जुगलकिशोर मालानी हिराबाई बजाज, जवाहरगेटचे राधेश्याम अग्रवाल, बुधवारास्थित पंकज वैद्य, बोहरा मस्जीदनजिकचे बालकिसन बाहेती, अंबागेटवरील विनोद वर्मा गजानन सोनसळे, पटवीपुऱ्याचे अरुण निळकरी, धनराज लेनस्थित गोवर्धन सोनी, जुना सराफािनवासी रणजीतसिंग चव्हाण, दहिसाथमधिल सोनी केशव पंत यांची निवासस्थाने धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे मनपाच्या अहवालात म्हटले आहे.

ठराविक वेळेत या इमारती पाडल्यास मनपातर्फे त्या पाडल्या जातील, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.
शहरातील अनेक शिकस्त इमारती सध्या महापालिकेच्या रडारवर असून संबंधितांना नोटीस बजावली आहे.

जीर्ण इमारतींना पाडण्याबाबत दरवर्षीच नोटीस दिल्या जातात, हे खरे आहे. दरम्यानच्या काळात बांधकाम, नगररचना अशा संबंधित विभागांकडून त्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. शिवाय इमारतींचे आयुर्मान तपासणाऱ्यांचा अहवालही मागवला जातो. त्यानंतर धोकादायक इमारती स्वत:हून पाडल्यास कारवाई केली जाते. हीच प्रक्रिया येथेही राबवली जाईल. चंद्रकांतगुडेवार, आयुक्त, महापािलका, अमरावती.

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी शहरातील जीर्ण शिकस्त इमारतधारकांना नोटीस दिल्या जातात. आजू-बाजूचे रहिवासी किंवा शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ही नोटीस जारी होते. परंतु मनपाच्या सल्ल्यानुसार कुणी वागल्याचे एकही उदाहरण मिळत नाही. दुसरे दुर्दैव म्हणजे मनपाही अशा इमारती पाडत नाही. आयुक्तपदी चंद्रकांत गुडेवार असल्यामुळे यावर्षी तरी किमान दरवर्षीसारखा अनुभव येणार नाही, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.