आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदन चोरट्याने पोलिसांवर केला कोयत्‍याचा वार, एपीआयनेही चालवली पिस्‍तुल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात रविवारी मध्यरात्री आढळून आलेल्‍या चंदन चोरट्यांनी एपीआय फिरोज खान पठाण यांच्यावर कोयत्याने वार केला. मात्र, पठाण यांनी वार चुकवला होता. या वेळी चोरट्यांच्या दिशने पठाण यांनी पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र, तरीही ते पसार झाले. या घटनेनंतर संपूर्ण शहर पोलिसांची यंत्रणा या चोरट्यांच्या शोधात आहे. मात्र, मंगळवारी रात्रीपर्यंत चोरट्यांचा शोध लागला नव्हता. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी चंदन चोरी प्रकरणात रेकॉर्डवर असलेल्या चोरट्यांची माहिती काढायला सुरुवात केली आहे.
शहरातून मागील काही महिन्यांपूर्वी चंदन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. मात्र, पोलिसांना चंदन चोरटे मिळाले नाही. रविवारी रात्री दोघे चंदनाचे ओंढके घेऊन जात असताना एका व्यक्तीला दिसल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळेच एपीआय पठाण अन्य दोन कर्मचारी वाहनाने चोरट्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान, चोरटे आणि पोलिसांचा समोरासमोर सामना झाला. त्या वेळी चोरट्याने कोयत्याने वार केला असता तो हुकवून एपीआय पठाण यांनी फायर केला. चोरट्यांच्या शोधार्थ शोधमोहीम राबवूनही अद्याप चोरटे मिळाले नाहीत.
"ते' चंदनाचे ओंडके कुठले?
पोलिसांसोबत झटापट झाली, त्या वेळी चोरट्यांनी तीन ओंडके त्यानंतर महापौर बंगल्यासमाेर चार असे सात ओंडके पोलिसांनी जप्त केले. हे चंदनाचे झाड चोरट्यांनी कोणत्या ठिकाणाहून चोरले आहे, हे अद्याप पुढे आले नाही. घटनेला ४० तासांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. मात्र, कोणीही चंदन चोरीबाबत तक्रार पोलिसात दाखल केली नाही. त्यामुळे हे ओंडके कोणत्या ठिकाणाचे आहे, याचीही माहिती पोलिस घेत आहे.